KL Rahul Athiya Shetty: 50 कोटीचं घर, 2 कोटीची गाडी आणि.. सुनिल शेट्टीच्या लेकीला गिफ्ट आलेत की मस्करी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KL Rahul Athiya Shetty wedding gifts ₹50 crore house, Audi car and more

KL Rahul Athiya Shetty: 50 कोटीचं घर, 2 कोटीची गाडी आणि.. सुनिल शेट्टीच्या लेकीला गिफ्ट आलेत की मस्करी..

KL Rahul Athiya Shetty wedding gifts: सुपरस्टार सुनिल शेट्टीची लेक बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू केएल राहुल यांचा शुभविवाह दोन दिवसांपूर्वी अत्यंत दिमाखात पार पडला. सुनिल शेट्टीच्या लोणावळा येथील फार्म हाऊसवर हा शाही विवाह सोहळा रंगला.

यावेळी घरच्या मंडळींसह बॉलीवुड मधील काही कलाकारांनीही हजेरी लावली होती. पण त्यांनी नुसती हजेरी लावली नाही तर भेटवस्तूही दिल्या. बरं त्या केवळ सामान्य भेटवस्तू नाहीत तर कोट्यावधींच्या भेटवस्तू आहेत. ज्यांची एकूण किंमत आपल्या कल्पनेला झेपणारी आहे. अशा महागड्या वस्तु या यादीत आहेत.

(KL Rahul Athiya Shetty wedding gifts ₹50 crore house, Audi car and more)

हेही वाचा: ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

अथिया आणि राहुल यांच्या लग्नात सर्वात महागडं गिफ्ट दिलं ते म्हणजे वडील सुनिल शेट्टी यांनी. बापाने लेकीला म्हणजे अथियाला चक्क मुंबई मध्ये 50 कोटींचं घर भेट म्हणून दिलं आहे. तर त्या पाठोपाठ अभिनेता सलमान खानचा नंबर येतो. त्याने या जोडप्याला 1 कोटी 64 लाखांची ऑडी कार भेट दिली आहे.

अभिनेता अर्जुन कपूर यांनी 1.5 कोटी रकमेचं ब्रेसलेट तर जॅकी श्रोफ यांनी 30 लाखांचं घडयाळ दिलं आहे. याशिवाय बॉलीवुड,मधून अनेक महागड्या भेटवस्तू त्यांना मिळाल्या आहेत.

हेही वाचा: Republic Day 2023: 'या' गाण्यांशिवाय आज तुमचा दिवस सुरू होणे अशक्यच!. जाणून घ्या सविस्तर..

तर क्रिकेट जगतातूनही त्यांना महागड्या भेटवस्तू आल्या आहेत. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याने राहुल आणि अथियाला 2.17 कोटी रुपयांची BMW कार भेट दिली आहे. तर कॅप्टन कुल म्हणून ओळख असलेल्या धोनीने नवविवाहित जोडप्याला कावासाकी निन्जा बाईक भेट दिली आहे, ज्याची किंमत 80 लाख रुपये आहे.

विशेष म्हणजे ही बाईक धोनीच्या स्वतःच्या बाईक कलेक्शनमधील असून, या बाईकची किंमत सुमारे 80 लाख रुपये आहे. याशिवाय त्यांचे नातेवाईक आणि मित्र मंडळींकडून अनेक भेटवस्तू आल्या आहेत ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे.