पानीपतचा इब्राहीम खान गारदी आहे 'या' अभिनेत्रीचा पती

वृत्तसंस्था
शनिवार, 14 डिसेंबर 2019

पानिपत' मध्ये इब्राहीम खान गारदीची भूमिका अभिनेता नवाब शहाने साकारली. पानिपतमधील त्याच्या रोलमुळे तो चर्चेत आला आहे. पानिपतच्या इब्राहिम खान गारदीची पत्नी कोण आहे हे माहित आहे का ? 

मुंबई : 'पानिपत' मध्ये इब्राहीम खान गारदीची भूमिका अभिनेता नवाब शहाने साकारली. पानिपतने सलग आठव्या दिवशीही बकक्ळ कमाई करत नवीव चित्रपटांना टक्कर दिली आहे. पानिपतमध्ये नवाबने चांगल्या अभिनयासह उत्तम कामगिरी केली आहे. पानिपतमधील त्याच्या रोलमुळे तो चर्चेत आला आहे. पानिपतच्या इब्राहिम खान गारदीची पत्नी कोण आहे हे माहित आहे का ?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Monday Vibes

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra) on

नवाब शहाची बायको आहे अभिनेत्री पुजा बत्रा. बॉलिवूडमध्ये काही वर्षांपूर्वी टॉपची अभिनेत्री अशी जिची ओखळ होती ती म्हणजे पूजा बत्रा. गेल्या काही काळापासून मात्र ती बी-टाऊनपासून दूर आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

lady thinks like a boss

A post shared by Nawab Shah (@nawwabshah) on

पूजाने 2002 मध्ये  सर्जन सोनू अहलूवालियाशी लग्न केले आणि ती अमेरिकेत शिफ्ट झाली. हे नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि आठ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर अभिनेता नवाब शहासोबत तिने याचवर्षी 4 जुलैला लग्न केले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra) on

पुजा सिनेमांपासून दूर असली तरी मात्र सोशल मीडियावर ती सतत अॅक्टीव असते. बोल्ड फोटोंमुळे ती अनेकदा चर्चेचा विषय ठरते. एका मुलाखतीमध्ये लग्नाविषयी बोलताना पुजा म्हणाली, ' माझ्या जवळचे मित्र मला विचारायचे की लग्न करण्यासाठी इतका वेळ का घेत आहे. मला मोकळं जीवन जगायचं होतं, जसं सुरु आहे तसचं सुरु ठेवायचं होतं. पण, नवाबला भेटून लक्षात आलं की, हिच ती व्यक्ती आहे जिच्यासोबत मी संपूर्ण आयुष्य राहू शकते.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

We Did 

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra) on

पूजाने 'फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल' चा किताब जिंकला आहे. विरासत, नायक, हसीना मान जाएगी, भाई, फर्ज आणि एबीसीडी 2 या चित्रपटांतून पूजा झळकली आहे. पूजा इन्स्टाग्रामवर पती नवाबसोबत अनेकदा रोमॅन्टीक तर कधी बोल्ड फोटो अपलोड करते. हे फोटो अनेकदा व्हायरल होत असतात आणि या जोडीला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra) on

लग्नाविषयी बोलताना नवाब म्हणाला, ' मी पूजाला तिच्या परिवारासमोरच प्रपोज केले होते. मी असं काही ठरवलं नव्हतं पण, ते घडलं. तो आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होता.' नवाबने दबंग 3, टायगर जिंदा है, डॉन 2, भाग मिल्खा भाग, दिलवाले, हमशकल्स असे अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know about wife of panipat actor nawab shah