बॉलीवूडचा धिक्कार! कोयना मित्राचा आरोप चर्चेत....Koena Mitra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Koena Mitra

बॉलीवूडचा धिक्कार! कोयना मित्राचा आरोप चर्चेत...

आज बॉलीवूडमध्ये काम हवंय तर अभिनय उत्तम येणं जितकं गरजेचं आहे त्याहुनही किंबहुना कांकणभर अधिक जास्त लूक्स मॅटर करतात. त्यासाठी अभिनेत्री अनेकदा प्लास्टिक सर्जरीचा पर्याय निवडताना दिसतात. पण अनेकदा प्लास्टिक सर्जरी फसते आणि मग होत्याचं नव्हतं होऊन बसतं. आता बिचा-या कोयना मित्राच्या(Koena Mitra) बाबतीतही तसंच काहीसं झालं आहे. तिनं चेह-याची प्लास्टिक सर्जरी केली खरी पण चांगलं दिसायचं सोडून तिच्या चेह-यात असा काही बदल झाला की खलनायिकेचं काम मिळावं इतकाही तिचा चेहरा धड राहिला नाही. कोयनाच्या चेह-यात असे काही विचित्र बदल झाले की तिला पाहिलं की लोकं हसायचे,मागून टीका-टीप्पणी करायचे असं तिनं एका मुलाखतीत सांगितलंय. इतकंच नाही तर तिचा छळही करण्यात आला तोही तब्बल तीन वर्ष.

२००२ मध्ये कोयनानं 'रोड' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर अभिनेत्री 'हे बेबी','अपना सपना मनी मनी' मध्ये दिसली होती. पण कोयना सर्वाधिक लक्षात राहिली ते संजय दत्त,अनिल कपूर यांच्या 'मुसाफिर' सिनेमातील तिच्या 'साकी साकी' या गाण्यामुळे म्हणजे आयटम सॉंगमुळे. नोरा फतेहीनं न्यू व्हर्जनवर नृत्य केलं असलं तरी कोयनाही लोकांच्या लक्षात आहे हे विसरून चालणार नाही. त्या गाण्यात ती फक्त हॉट नाही तर देखणीही दिसली होती. पण तिला कुठलं प्लास्टिक सर्जरीचं खुळ सुचलं अन् सगळंच तिनं मांडलेलं गणित बिघडून बसलं.

हेही वाचा: कोरोनामुळे पुन्हा 'शुटिंग बंद?'...सविस्तर वाचा

कोयना त्या मुलाखतीत असंही म्हणाली होती की,''एक काळ होता की मला मोठे ब्रेक मिळाले होते. मी माझं काम चांगल करूनही दाखवलं. तोपर्यंत सगळे माझ्याशी चांगले होते. पण माझ्या प्लास्टिक सर्जरीनंतर हेच बॉलीवूडकर आहेत ज्यांनी माझं करीअर संपवण्याचा ध्यास घेतलेला. मला तोंडावर सपोर्ट दाखवणारे मागून मात्र मला नावं ठेवायचे''. असं म्हणत तिनं नाव नं घेता संपूर्ण बॉलीवूडला टार्गेट केलंय.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top