कोरोनामुळे पुन्हा 'शुटिंग बंद?'...सविस्तर वाचा Karan Johar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia Bhatt, Ranveer Singh, Karan Johar

कोरोनामुळे पुन्हा 'शुटिंग बंद?'...सविस्तर वाचा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता हळूहळू रोज नवीन नियमावली जाहीर केली जातेय. लॉकडाऊन पर्याय नसल्याचं बोललं जात असलं तरी वाढती रुग्णसंख्या पाहून लॉकडाऊनचा निर्णय जाहीर होतोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. मनोरंजन क्षेत्रावर तर या कोरोनाच्या भीतीचं सावट आता हळूहळू जास्तच पसरू लागलंय. कारण बिग बिजेट सिनेमांच्या निर्मात्यांनी सिनेमा प्रदर्शनाच्या तारखा आधीच पुढे ढकलल्या आहेत. '83' सारख्या चांगल्या सिनेमाच्या बॉक्सऑफिस कलेक्शनला कोरोनामुळे मोठा फटका बसलेला आहे. याचं कारण म्हणजे दिल्ली आणि काही इतर राज्यात मल्टिप्लेक्स,सिंगल थिएटर्स बंद करण्याचा कडक नियम. त्यात मुंबईतही शोज ची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यात सध्या काही सिनेमांच्या निर्मात्यांनी आता चालू शुटिंगच्या तारखाही पुढे ढकलल्याचं कळतंय. काय झालंय नेमकं जाणून घेऊया.

हेही वाचा: खल्लास! श्वेता तिवारीचा 'किलर लूक' पाहायला चाहत्यांची उडाली झुंबड...

खबर आहे की मुंबईतही एक-दोन दिवसांत वाढत्या रुग्णसंख्या पाहता गर्दीच्या आणखी काही जागा हेरून तिथं नियमावली कडक केली जाईल. त्यात सर्वप्रथम बोललं जातंय शुटिंगच्या सेटवर बंदी येऊ शकते. त्यामुळे काही निर्मात्यांनी भीतीनं काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत. आणि मुंबईतील शुटिंगच्या तारखा पंधरा एक दिवसांसाठी पुढे ढकलल्या आहेत. त्यात बातमी आहे की सध्या करण जोहर निर्मित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमातील एका महत्त्वाच्या गाण्याचं शुटिंग मुंबईत होणार होतं. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दहा जानेवारीचं शुटिंग पुढे ढकलण्यात आलंय.

हेही वाचा: मृत्यूच्या एक दिवस आधी इरफान बेशुद्धावस्थेतही खूप रडला होता...

बोललं जातंय की कोरोनाच्या भीतीनं सेटवर काम करणा-या सर्वच लोकांनी काम करण्यास नकार दिल्यानं करण जोहरला शुटिंग पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागलाय. पण अशीही उडती खबर आहे की मुंबईत कदाचित शुटिंग करण्यावर बंदी आणली जाऊ शकते पुढील एक-दोन दिवसांत, म्हणूनच खबरदारी म्हणून नुकसान टाळण्यासाठी करणनं हा निर्णय घेतलाय. या सिनेमातनं रणवीर सिंग आणि आलिया भट्ट पुन्हा एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. सिनेमा १० फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे,त्यामुळे तसा अवकाश आहे. आणि ब-यापेकी सिनेमाचं चित्रिकरण सध्या दिल्ली,चंदिगढमध्ये पूर्ण करण्यात आलंय. मुंबईत शुट होणारं गाणं सिनेमाचं सिंग्नेचर सॉंग आहे. आता एक-एक करून शुटिंग बंद होत असल्यामुळे खरोखरंच मुंबईत जारी करणा-या पुढच्या कडक नियमावलीत शुटिंगच्या सेटवर घाला येणार का या चर्चेला उधाण आलंय.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top