Koffee With Karan 7: 'आमचं आहे!' सिद्धार्थ - कियाराचं 'लग्नाचं प्लॅनिंग'

बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणजे कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचे नाव सांगता येईल. बऱ्याच काळापासून ते दोघे (Bollywood Actress) एकमेकांना डेट करत आहे.
Koffee With Karan 7 news
Koffee With Karan 7 news esakal
Updated on

Bollywood News: बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणजे कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचे नाव सांगता येईल. बऱ्याच काळापासून ते दोघे (Bollywood Actress) एकमेकांना डेट करत आहे. शेरशहापासून त्यांच्यातील केमिस्ट्री ही आणखीनच प्रेक्षकांना भावली होती. मात्र काही दिवसांपासून (Karan Johar) त्यांच्यात सगळं आलबेल नसल्याची बातमी समोर आली होती. त्या दोघांनी ब्रेकअप केल्याच्या चर्चेला सोशल मीडियावरुन उधाण आले होते. त्यात आता हे दोन्ही सेलिब्रेटी करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या सातव्या सीझनमध्ये (Entertainment News) सहभागी झाले होते. त्यात करणनं त्यांना त्यांच्या रिलेशनशिपवरुन छेडल्यानंतर दोन्ही सेलिब्रेटींनी जे उत्तर दिले त्यावरुन चाहत्यांना आनंद झाला आहे.

करण जोहरचा शो सेलिब्रेटींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वादग्रस्त विधानं, धक्कादायकं वक्तव्ये आणि गोड बातम्या यामुळे चर्चेत आहे. एकीकडे त्याच्या प्रॉडक्शन हाऊसला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे त्याच्या कॉफी विथ करणच्या सातव्या सीझनला मात्र प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यात करण सेलिब्रेटींना अजब प्रश्न विचारुन त्यांना बोलते करतो. यापूर्वी अक्षय - समंथा, आमिर - करिना, आलिया - रणबीर, सोनम आणि अर्जुन कपूर, विकी कौशल या सेलिब्रेटींना त्यानं बोलते केले होते.

आता कियारा आणि सिद्धार्थनं करणच्या त्या शो मधून एक चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. करणनं त्यांना त्यांच्या रिलेशनशिपवरुन प्रश्न विचारला होता. यावर कियारा आणि सिद्धार्थनं त्यांच्या लग्नाचे प्लॅनिंग देखील सांगितले आहे. त्या दोघांनी आपलं एकमेकांवर प्रेम असल्याचे सांगितले आहे. त्याचं झालं असं की, करणच्या त्या शोमध्ये विकी कौशल आणि सिद्धार्थ गेले होते. तेव्हा करणनं कियाराचा एक व्हिडिओ सिद्धार्थला दाखवला. तेव्हा करणनं सिद्धार्थला प्रश्न विचारला होता.

Koffee With Karan 7 news
Flop Bollywood: 'आपले पैसे कुठे जातात? टेन्शन घ्यायचं नाही', तब्बुचं अजब विधान

चाहत्यांना आम्ही लवकरच लग्नाची बातमीही देऊ, त्याचे प्लॅनिंग आम्ही सुरु केले आहे. पण मी ते काही कॉफी विथ करणमध्ये सांगणार नाही. करणनं विचारलेल्या रोखठोक प्रश्नानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. नेटकऱ्यांनी त्याचे कौतूकही केले आहे. सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि कियाराच्या त्या बातमीवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Koffee With Karan 7 news
Flop Movies: टॉलीवूडपुढे टाकली मान! या वर्षातील बॉलीवूडचे 10 फ्लॉप चित्रपट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com