करण जोहरवर कंटेट चोरीचा आरोप, सारा-जान्हवी एपिसोड प्रकरण | Koffee With Karan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karan Johar

करण जोहरवर कंटेट चोरीचा आरोप, सारा-जान्हवी एपिसोड प्रकरण

करण जोहरचा टाॅक शो पुन्हा एकदा वादात अडकला आहे. एका लेखिकाने आरोप केला आहे, की शोच्या अलीकडच्या एपिसोडमध्ये त्याने लिहिलेला काँटेन्ट चोरला गेला. याबाबत माहिती दिली गेली नाही. तसेच क्रेडिटही दिले गेले नाही. काॅफी विथ करणच्या (Koffee With Karan) दुसऱ्या एपिसोडमध्ये जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) पाहुणे म्हणून आले होते. लेखिकाचा आरोप आहे, की शोमध्ये एक सेग्मेंट ज्यात जान्हवी व साराशी चित्रपटाशी संबंधित प्रश्न विचारले गेले होते. ती तिच्या लेखातून उचलले गेले होते. या प्रकरणावर लेखिकाने संताप व्यक्त केले आहे. मी शांत बसणार नाही, असा तो म्हणाला.

हेही वाचा: 'आती क्या खंडाला'वर आमिर खानने नीतू कपूरबरोबर केला डान्स, पाहा Video

पोस्ट केला 'के ३ जी' चा शूलेसचा प्रश्न

काॅफी विथ करण सीझन ७ चा (Koffee With Karan Season 7) दुसरा एपिसोड गुरुवारी प्रसारित करण्यात आला होता. त्याची चर्चा अद्यापही सुरुच आहे. शुक्रवारी पत्रकार मान्या लोहित आहुजाने एपिसोडचे काही व्हिडिओज पोस्ट केले. त्याबरोबर एक लेखही होता. तो त्यांनी आयडिव्हासाठी २०२० मध्ये लिहिला होता. त्याचा काँटेन्ट करण जोहरच्या त्या एपिसोडमध्ये वापर केला गेला. या लेखाचे शीर्षक होते 'काॅलिंग ऑल बाॅलीवूड बफ्स' वाईट प्रकारे स्पष्टीकरण केलेल्या प्लाॅटमधून चित्रपट सांगा. यात 'कभी खुशी कभी गम'शी संबंधित प्रश्न होता. असाच प्रश्न करण जोहरनेही (Karan Johar) विचारला होता.

हेही वाचा: 'जय शंभू नारायण..' अरुण गवळी, मुंबईचा थरार आणि 'दगडी चाळ २' लवकरच..

मला क्रेडिट हवे

ट्विटमध्ये लिहिले की तर काॅफी विथ करणने आयपी उचलले जे की मी आयडीव्हासाठी सुरु केले होते. पूर्ण काॅपी जशीच्या तशी उचलली. मीही कल्पना घेऊन आले होते आणि मला ते लिहिताना खूप आनंद आला होता. त्यांनी क्रेडिट न देण्यावर फारच क्षुल्लक गोष्ट सांगितली आहे. त्या म्हणतात, तुम्ही जर काॅपी घेत असाल तर क्रेडिट द्यायला हवे. पत्रकाराने स्टार वर्ल्ड, डिस्नी प्लस हाॅटस्टार आणि श्रीमी वर्माला टॅग केले असून ते सर्व शोचे क्रिएटिव्ह टीमचा भाग आहेत. होऊ शकते जग बदलू शकणार नाही. मात्र मला क्रेडिट हवे, माझे त्यासाठी काहीही होवो.

Web Title: Koffee With Karan Accused Of Plagiarism Use Content In Janhvi Kapoor Sara Ali Khan Episode

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..