'आती क्या खंडाला'वर आमिर खानने नीतू कपूरबरोबर केला डान्स, पाहा Video

'आती क्या खंडाला'वर आमिर खानने नीतू कपूरबरोबर केला डान्स
Aamir Khan And Neetu Kapoor
Aamir Khan And Neetu Kapooresakal

रियालिटी टीव्ही शो 'डान्स दिवाने ज्युनिअर'चा (Dance Deewane Juniors) प्रवास आता ग्रँड फिनालेच्या दिशेने सुरु झाला आहे. या विशेष कार्यक्रमात स्पर्धकांपासून परीक्षकांपर्यंत प्रत्येक जण सुपरस्टार आमिर खानबरोबर (Aamir Khan) स्टेज शेअर करताना दिसले. आमिर खान या रियालिटी शोमध्ये आपला आगामी चित्रपट 'लालसिंग चढ्ढा'च्या प्रमोशन करण्यासाठी आला आहे. या विशेष एपिसोडचा एक प्रोमो व्हिडिओ नुकताच शेअर केला गेला आहे. त्यात आमिर खान नीतू कपूरबरोबर (Neetu Kapoor) स्टेज शेअर करताना दिसत आहे. (Dance Deewane Juniors Aamir Khan And Neetu Kapoor Dance On Aati Kya Khandala Song)

Aamir Khan And Neetu Kapoor
आयफा पुरस्कार सोहळ्यात सलमान खान झाला भावूक, अहान शेट्टीच्या गळ्यात पडून...

गुलामच्या गाण्यावर आमिरचा बिंदास डान्स

या प्रोमो व्हिडिओत आमिर खान आणि नीतू कपूर चित्रपट 'गुलाम' या चित्रपटाच्या 'ए क्या बोलती तू' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. दोघांना डान्स करताना पाहणारा होस्ट करण कुंद्रा आणि इतर लोक जोराजोराने आवाज देऊ लागले.

Aamir Khan And Neetu Kapoor
सब तख्त गिराए जाएंगे असे म्हणत विवेक अग्निहोत्रींची तिस्ता सेटलवाडवर टीका

आमिर खान आणि नीतू कपूरने चित्रपट गुलामचे हे गाणे स्टेजवर असा काही प्रकारे रिक्रिएट केले की पाहणारे फक्त पाहातच राहिले. व्हिडिओ कलर्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com