
'कॉफी विथ करण ' नव्या सिझनला लागला ब्रेक; करण जोहरनं केली मोठी घोषणा
बॉलीवूड चा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर(karan Johar) हा सिनेमा व्यतिरिक्त आपला चॅट शो 'कॉफी विथ करण' मुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. छोट्या पडद्यावर या शो ची भरपूर चर्चा आतापर्यंत रंगलेली दिसून आली. 'कॉफी विथ करण'मध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींसोबत क्रिडा जगतातील मोठमोठ्या खेळाडूंनी देखील आतापर्यंत उपस्थिती दर्शवली होती. अर्थात इथे येऊन प्रत्येकानं आपल्या आयुष्यातील मोठे खुलासे देखील केलेले आपण पाहिले असतील. याच्या प्रत्येक सीझनची चाहत्यांना प्रतिक्षा असायची. काही दिवसांपूर्वीच बातमी होती की करणचा 'कॉफी विथ करण' या शो चा नवा सिझन भेटीस येत आहे. पण आता मोठी घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली आहे की,करणच्या या शो चा नवा सिझन आता येणार नाही. काय आहे नेमकं कारण याचा देखील खुलासा केला आहे. चला जाणून घेऊया सविस्तर.
करण जोहरनं आपल्या 'कॉफी विथ करण'चा नवा सिझन येत नसल्याचं स्वतः सोशल मीडियावर जाहिर केलं आहे. करण जोहर सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी नेहमी खास फोटो,व्हिडीओ शेअर करताना दिसतो. करण जोहरनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केलेली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यानं सांगितलं आहे की 'कॉफी विथ करण'चा पुढील सिझन आपल्या भेटीस येत नाही. करणनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,''हॅलो,आतापर्यंत 6 सिझन 'कॉ़फी विथ करण'चे झाले आहेत. आणि हे सगळेच सिझन माझ्या आयुष्याचा एक खास भाग राहिले आहेत. मला वाटतं की या शो मुळे आपण पॉप संस्कृतीच्या इतिहासाचा एक भाग बनलो आहोत. आणि या शो नं छान कामगिरीही केली आहे. त्यामुळे आता मला ही घोषणा करताना मन भरुन आलं आहे की, 'कॉफी विथ करण' पुन्हा भेटीस येणार नाही-करण जोहर''. सोशल मीडियावर करणची पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.
हेही वाचा: ईदच्या पार्टीत शहनाझ-सलमानची जवळीक कॅमेऱ्यात कैद; kiss करतानाचा Video Viral
करण जोहरच्या चाहत्यांनीच त्याच्या या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. आपल्या माहितीसाठी सांगतो की,'कॉफी विथ करण' हा चॅट शो छोट्या पडद्यावरील चर्चेतील शो पैकी एक आहे. 2004 मध्ये हा शो सुरु झाला होता. या सिझनचा पहिला एपिसोड 19 नोव्हेंबर 2004 ला प्रदर्शित झाला होता. या शो नं पहिल्या एपिसोडपासूनच चाहत्यांचं मन जिंकलं होतं. 'कॉफी विथ करण'चा शेवटचा एपिसोड 17 मार्च 2019 साली प्रदर्शित झाला होता. हा 6 व्या सिझनचा शेवटचा एपिसोड होता. या शो मध्ये बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी भाग घेऊन आपल्या आयुष्यातील अनेक इंट्रेस्टिंग खुलासे केले होते. त्यामुळे हे सर्व आता पुन्हा अनुभवता येणार नाही याकारणानं चाहते नाराज झाले आहेत.
Web Title: Koffee With Karan Isnt Returning Confirms Karan Johar It Is With A Heavy
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..