Koffee with Karan seson 8 Teaser : ऐकलं का? तो पुन्हा येतोय, 'कॉफी विथ करण' ला नाही मरण, आठव्या सीझनचा पहिला गेस्ट कोण?

आता बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण या मालिकेचा आठवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Koffee with Karan seson 8 Promo Viral social media
Koffee with Karan seson 8 Promo Viral social mediaesakal

Koffee with Karan seson 8 Promo Viral social media : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये ज्या शो ने स्वताची वेगळी ओळख तयार केली त्यात करण जोहरच्या कॉफी विथ करणचे नाव घ्यावे लागेल. भारतात काही मालिका आणि रियॅलिटी शो च्या वाट्याला मोठं यश आलं असे म्हणावे लागेल.

त्यात केबीसी, बिग बॉस, कपिल शर्मा शो, या सारखे रियॅलिटी शो आणि तारक मेहता का उल्टा चष्मा, अनुपमा, कसोटी जिंदगी की या मालिका नेहमीच लोकप्रियतेच्या बाबत आघाडीवर राहिल्या आहेत.

आता बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण या मालिकेचा आठवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा टीझर आता करणनं त्याच्या इंस्टावरुन शेयर केला असून त्याला मिळालेला प्रतिसाद मोठा आहे. गेल्या काही दिवसांपासून करणच्या या नव्या सीझनची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अखेर तो समोर आला असून त्यानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Also Read - Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

येत्या २६ ऑक्टोबर रोजी डिझ्नी हॉटस्टारवरुन या मालिकेचे प्रक्षेपण होणार आहे. करणच्या शो मध्ये नवे गेस्ट कोण येणार याची नेहमीच चर्चा होताना दिसते. त्याच्या या शो मध्ये यापूर्वी अभिनेत्री प्रियंका चोप्रा, करिना कपूर, करिश्मा कपूर, राणी मुखर्जी, काजोल, श्रद्धा कपूर, दिशा पटानी, क्रिती सेनॉन, भूमि पेडणेकर या अभिनेत्री सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. याशिवाय वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, सलमान खान, अक्षय कुमार, शाहरुख खान, विकी कौशल सारख्या कलाकारांनी त्याच्या या शोमध्ये उपस्थिती लावली आहे.

आता येणाऱ्या आठव्या सीझनमध्ये कोणत्या पाहुण्या कलाकाराच्या मुलाखतीनं करण सुरुवात करणार याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना होती. त्यात प्रसिद्ध अभिनेता सनी देओल हा करणच्या कॉफी विथ करणच्या आठव्या सीझनचा प्रमुख पाहुणा असणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. बॉलीवूडमधील रंजक किस्से, वेगवेगळ्या आठवणी आणि सेलिब्रेटींच्या वैयक्तिक आय़ुष्यातील गप्पा गोष्टी याची मेजवानी करणच्या या शो मधून मिळत असते.

गेल्या दीड दशकांहून अधिक काळ करणचा हा शो प्रेक्षकांच्या आवडीचा आणि कौतुकाचा विषय असल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये कित्येक दिग्गज सेलिब्रेटींनी सहभाग घेतला आहे. हा शो नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे वादाचे कारणही ठरला आहे. त्यातून कित्येक सेलिब्रेटींनी पोलखोल केली आहे. काहींनी भलतेच धक्कादायक खुलासेही केले आहे. त्यामुळे करणच्या या शो ची चाहते नेहमीच वाट पाहत असतात.

Koffee with Karan seson 8 Promo Viral social media
Sunny Deol Entry in Ramayan: रणबीरच्या रामायणात आता 'गदर' होणार! सनी पाजी साकारणार 'ही' भूमिका?

सोशल मीडियावर करणच्या कॉफी विथ करणच्या आठव्या सीझनचा टीझर समोर आला असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. करणनं तो व्हिडिओ शेयर करताना म्हटलं आहे की, सगळेजण तयार राहा, तुमच्या आवडीचा कॉफी विथ करणचा आठवा सीझन येत्या २६ ऑक्टोबरला तुम्हा सर्वांच्या भेटीला येतो आहे. त्यावर त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

२०२२ मध्ये कॉफी विथ करणची सुरुवात प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या मुलाखतीनं झाली होती. त्यानंतर कियारा अडवाणी, शाहिद कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, समंथा रुथ प्रभू, टायगर श्रॉफ, क्रिती सेनॉन, सारा अली खान, जान्हवी कपूर हे सहभागी झाले होते.

Koffee with Karan seson 8 Promo Viral social media
Shah Rukh Khan: 'यापुढे मी कधीही...' ती गोष्ट सांगून शाहरुखनं चाहत्यांना केलं निराश, काय म्हणाला किंग खान?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com