'कोण होणार करोडपती'मध्ये सहभागी होण्यासाठी अशी करा नोंदणी

kon honar crorepati
kon honar crorepati
Updated on

ज्ञानाच्या जोरावर पैसे जिंकण्याची संधी देणारा कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. हा लोकप्रिय कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याच्या नोंदणीला सुरुवात होणार आहे. एक मिस्ड कॉल देऊन तुम्ही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या कार्यक्रमाच्या हिंदी पर्वाचं सूत्रसंचालन करतात. या कार्यक्रमाचं हिंदी पर्व जितकं चर्चेत असतं, तितकीच मराठीचीही चर्चा होते. याआधी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी 'कोण होणार करोडपती'चं सूत्रसंचालन केलं होतं. 

आपल्या देहबोलीमुळे आणि आवाजामुळे सचिन खेडेकर हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. या कार्यक्रमात सामान्यजन स्पर्धक  म्हणून हॉटसीटवर येतात. त्या प्रत्येकाला आपलंसं करून त्यांच्याबरोबर हा ज्ञानाचा खेळ खेळावा लागतो. प्रेक्षकांना मोहित करून टाकणारा आवाज आणि समोरच्याशी संवाद साधण्याचं कसब हे खेडेकरांचे गुण आहेत आणि त्यामुळेच स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना ते आपलेसे वाटतील यात शंका नाही.

महाराष्ट्राने अनेक नामवंत जगाला दिले आहेत. महाराष्ट्र खऱ्या अर्थानं विद्येचं माहेरघर आहे. 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात माहित आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या, मराठी मातीतल्या माणसांना हॉटसीटवर बसण्याची आणि करोडपती होण्याची संधी मिळणार आहे. 'कोण होणार करोडपती' ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी  २४ मार्चपासून नोंदणी सुरू होणार आहे. २४ मार्च ते २ एप्रिल यादरम्यान ८०८०० ४४ २२२ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षक  नोंदणी करू  शकतात.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com