
'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व येतंय भेटीला
सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरांत पोचला आहे. तुमचं ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं, हे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर (Sachin Khedekar) करणार आहेत. गेल्या पर्वामध्ये सचिन खेडेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना आपलंस करून घेतलं होतं. सचिन खेडेकर मराठी घराघरांत सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. आपली देहबोली आणि आवाज यामुळे ते प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत.
प्रत्येक खेळात कोणी जिंकतं किंवा कोणी हरतं, पण या खेळात फक्त स्पर्धक जिंकतो, असं सांगणारा कार्यक्रमाचा प्रोमो आला आहे. २३ फेब्रुवारी ते ८ मार्च यादरम्यान 'कोण होणार करोडपती' या खेळात सहभागी होण्यासाठीचे प्रश्न सुरू होतील. 14 दिवस आणि 14 प्रश्न असं याचं स्वरूप आहे.
असे व्हा सहभागी
7039077772 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंवा सोनी लिव्हवर नावनोंदणी करून या खेळात सहभागी होता येईल.
स्वप्न उतरवा सत्यात
करोडपती बनण्याचं स्वप्न सगळेच पाहतात, पण प्रत्येकाला तशी संधी मिळतेच असं नाही. पण आपल्याला असलेल्या ज्ञानाच्या आधारे ते स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम सामान्य प्रेक्षकांना उपलब्ध करून देणार आहे.
Web Title: Kon Honar Crorepati Sachin Khedekar Next Season
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..