Kranti Redkar: जाळ अन धूर संगच! नागपुरात सावजी मटण खाऊन क्रांतीची अवस्था बिकट.. व्हिडीओ झाला व्हायरल..

क्रांती रेडकर सोशल मीडियावर नेहमीच फनी व्हिडीओ पोस्ट करत चर्चेत येत असते.
Kranti Redkar
Kranti RedkarEsakal

Kranti Redkar: नागपुरमध्ये गेलो आणि सावजी मटण खाल्लं नाही असं फार कमी वेळा घडत असेल. आपण ज्या शहरात..राज्यात..देशात जातो तिथली संस्कृती आणि खाद्यपरंपरा जाणून घेतली नाही तर तिथे जाण्यात काहीच अर्थ नसतो.

आता आपल्या सर्वांची लाडकी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिनं एक व्हिडीओ पोस्ट केलाय ज्यात ती नागपुरची खाद्यसंस्कृची एन्जॉय करताना दिसतेय. पण हे करताना बिचारीची अवस्था खूपच बिकट झाल्याचं समोर आलं आहे. आणि तिचा तो भन्नाट व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांची हसून पुरती वाट लागली आहे. (Kranti Redkar eating sawji mutton nagpur funny video viral)

क्रांती आपले पती समीर वानखेडे यांच्यासोबत नागपूर मध्ये काही कामानिमित्त गेली आहे. तिनं शेअर केलेल्या व्हिडीओत ती,समीर वानखेडे आणि दोन मैत्रिणी दिसत आहेत. नागपुरमधील सावजी मटणासाठी प्रसिद्ध असलेल्या एका हॉटेलात ते सगळे गेलेले दिसत आहेत.

व्हिडीओच्या सुरुवातीला तर क्रांती असे विचित्र डोळे का करतेय हा प्रश्न पडतो पण मग तिचा कॅमेरा जेव्हा तिच्या पुढ्यात असलेल्या जेवणाच्या ताटाकडे जातो आणि त्यात सावजी मटण दिसतं तेव्हा ज्यांना त्या चवीची कल्पना असेल त्यांच्या लक्षात आलंच असेल सगळं मॅटर नेमकं काय असेल ते.

क्रांतीला अर्थातच ते तिखट जरा जास्तच झालेलं आहे. आणि सावजी मटणाच्या तिखट चवी संदर्भात ती इतकं मजेशीरपणे वर्णन करुन सांगतेय की तो व्हिडीओ खूपच गंमत आणत आहे.

क्रांतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होताना दिसत आहे.

क्रांती अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार मांडत असते. क्रांतीनं दिग्दर्शित केलेल्या 'रेन्बो' चित्रपटामुळे सध्या ती भलतीच चर्चेत आहे. उर्मिला कानेटकर,सोनाली कुलकर्णी,शरद केळकर,रिषी सक्सेना अशा कलाकारांनी 'रेन्बो' सिनेमात काम केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com