esakal | 'समीर वानखेडे धाड टाकतात तेव्हा..'; पत्नी क्रांती रेडकरची पोस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Sameer Wankhede Kranti Redkar

'समीर वानखेडे धाड टाकतात तेव्हा..'; पत्नी क्रांती रेडकरची पोस्ट

sakal_logo
By
स्वाती वेमूल

मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर Kranti Redkar सोशल मीडियावर बरेच मजेशीर व्हिडीओ पोस्ट करत असते. तिच्या या व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. नुकताच तिने पती समीर वानखेडेबद्दलचा Sameer Wankhede एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. समीर वानखेडे हे एनसीबीचे विभागीय संचालक आहेत. जर हे दोघं कॉलेजमध्ये डेट करत असते तर काय झालं असतं आणि आता ते जेव्हा विविध ठिकाणी धाड टाकतात तेव्हा क्रांतीच्या काय भावना असतात, अशा आशयाचा हा गमतीशीर व्हिडीओ क्रांतीने पोस्ट केला आहे. त्याचसोबत या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये क्रांतीने पतीविषयी काही ओळीसुद्धा लिहिल्या आहेत. (Kranti Redkar shares a video says its surely not easy being ncb official sameer wankhede wife slv92)

'मी इथे हसत असते, हसवत असते. पण त्यांची पत्नी म्हणून हे अजिबात सोपं नाही. माझ्यावर किती ताण असतो याची कल्पनासुद्धा केली जाऊ शकत नाही. पण मी खूप नशिबवान आहे की मी अशा व्यक्तीशी लग्न केलं जो योग्य गोष्टींसाठी लढतोय आणि कोणत्याही स्वार्थाशिवाय देशाची सेवा करतोय. माझ्या व्हिडीओवर कमेंट करून मला सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या नेटकऱ्यांचे आणि चाहत्यांचेही खूप खूप आभार', असं तिने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. c

हेही वाचा: 'तू मुलाला विकू शकत नाही'; तैमुरसाठी सैफवर भडकली करीना

हेही वाचा: अखेर 'देवमाणूस' घेणार प्रेक्षकांचा निरोप

समीर वानखेडे हे नाव गेल्या अनेक महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा बॉलिवूडचं ड्रग्स कनेक्शन समोर आलं तेव्हा अनेक सेलिब्रिटींवर कारवाई करणारे समीर वानखेडेच होते. बॉलिवूडचं असलेलं ड्रग्ज कनेक्शन त्यांनी उघड केलं होतं.

loading image