esakal | 'तू मुलाला विकू शकत नाही'; तैमुरसाठी सैफवर भडकली करीना
sakal

बोलून बातमी शोधा

kareena saif taimur

'तू मुलाला विकू शकत नाही'; तैमुरसाठी सैफवर भडकली करीना

sakal_logo
By
स्वाती वेमूल

करीना कपूर खान Kareena Kapoor Khan आणि सैफ अली खान Saif Ali Khan यांचा मुलगा तैमुर Taimur हा सर्वांत लोकप्रिय स्टारकिडपैकी एक आहे. चार वर्षांच्या तैमुरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल होतात. तैमुरचं स्टारडम हे बॉलिवूडमधल्या मोठ्या स्टारइतकंच आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. त्याच्या याच स्टारडममुळे चित्रपटांच्या प्रमोशनसाठी तैमुरला बोलवण्याचा सल्ला सैफला अनेक निर्मात्यांनी दिला होता. याबद्दलचा खुलासा सैफनेच सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत केला होता. मात्र करीनाने त्याला तीव्र विरोध केल्याचंही त्याने सांगितलं. (You can not sell your son said kareena kapoor to saif ali khan for his idea to sell taimur for nappy ads slv92)

२०१८ मध्ये सैफने ही मुलाखत दिली होती. "मी ज्या ज्या निर्मात्यांसोबत काम केलंय, त्या प्रत्येकाने मला तैमुरला प्रमोशनमध्ये बोलावण्याचा सल्ला दिला होता. कालाकांडी, हंटरच्या निर्मात्यांनी त्यासाठी भन्नाट कल्पनासुद्धा सुचविल्या होत्या. मात्र करीना त्यावेळी माझ्यावर खूप भडकली होती. तू तुझ्या मुलाला विकू शकत नाही, असं ती मला म्हणाली. तैमुरसाठी जर चांगल्या जाहिरातीची ऑफर आली, तर विचार करू असं मी करीनाला म्हणालो. पण तिचा त्याला पूर्णपणे विरोध होता", असं सैफने सांगितलं.

हेही वाचा: नेहा धुपियाकडे पुन्हा 'गुड न्यूज'! दुसऱ्यांदा होणार आई

एकीकडे तैमुरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असताना दुसरीकडे सैफ-करीनाने त्यांचा मुलगा 'जे' (Jeh) याला माध्यमांपासून लांबच ठेवणं पसंत केलंय. या वर्षाच्या सुरुवातीला करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. मात्र सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना तिने कधीच त्याचा चेहरा दाखविला नव्हता. करीनाने तिच्या गरोदरपणातील अनुभवांवर 'प्रेग्नन्सी बायबल' हे पुस्तक लिहिलंय. काही दिवसांपूर्वीच हा पुस्तक प्रकाशित करण्यात आला.

loading image