esakal | कृष्णा श्रॉफचा बोल्ड व्हिडिओ व्हायरल, टायगर म्हणाला..
sakal

बोलून बातमी शोधा

krishna tiger

कृष्णा श्रॉफने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिने लाल रंगाची बिकीनी घातली आहे. एका पुलाशेजारी बसलेला तिचा ग्लॅमरस अंदाज सगळ्यांचच लक्ष वेधून घेत आहे.

कृष्णा श्रॉफचा बोल्ड व्हिडिओ व्हायरल, टायगर म्हणाला..

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर खूप ऍक्टीव्ह असते. अनेकदा ती तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. यावेळी देखील तिने असाच एक बोल्ड व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून स्वत: टायगर देखील अवाक झाला आहे. त्याने यावर अशी कमेंट केली. आहे की त्याच्या या कमेंटमुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.

हे ही वाचा: शाहरुखच्या घरात एक रात्र राहण्याची जबरदस्त संधी, इथे करा अर्ज आणि...  

कृष्णा श्रॉफने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिने लाल रंगाची बिकीनी घातली आहे. एका पुलाशेजारी बसलेला तिचा ग्लॅमरस अंदाज सगळ्यांचच लक्ष वेधून घेत आहे. “लाल रंगात मी जाड दिसते का?” असा प्रश्न तिने या व्हिडीओच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना विचारला आहे. तिच्या या प्रश्नावर टायगर श्रॉफने अतरंगी कमेंट केली आहे. टायगरने तिच्या प्रश्नाला उत्तर देत म्हटलंय 'होय. खूप जाड' यासोबत ‘हॉट आणि फायर इमोटिकॉन’ असं म्हणत दिशा पटानीने तिचं कौतुक देखील केलंय.

टायगरच्या या गंमतीशीर कॉमेंटमुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कृष्णा तिच्या या बोल्ड अंदाजामुळे पहिल्यांदाच चर्चेचा विषय ठरत नाहीये. आधी देखील तिने अनेकदा असे ग्लॅमरस फोटो शेअर केले होते.

कृष्णाने अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी तिचा वेगळा चाहता वर्ग आहे. कृष्णा तिच्या फिटनेसमुळे ओळखली जाते. कृष्णा नेहमीच तिचा बॉयफ्रेंड एबन हॅम्ससोबत फोटो शेअर करायची मात्र काही दिवसांपुर्वी कृष्णाने बॉयफ्रेंड एबन हॅम्ससोबत ब्रेकअप झाल्याचं स्पष्ट केलं. सोशळ मिडियावरुन तिने त्याच्यासोबतचे फोटो देखील डिलीट केले होते. 

krishna shroff raises the heat with her bikini clad video this is how disha tiger reacted