Kriti Kharbanda And Pulkit Samrat
Kriti Kharbanda And Pulkit Samratesakal

Kriti Kharbanda And Pulkit Samrat Wedding: शुभमंगल सावधान! क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांनी बांधली लग्नगाठ, पाहा लग्नसोहळ्याचे खास फोटो

Kriti Kharbanda And Pulkit Samrat Wedding: क्रिती आणि पुलकित यांनी नुकतेच त्यांच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Kriti Kharbanda And Pulkit Samrat Wedding: अभिनेत्री क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) आणि अभिनेता पुलकित सम्राट (Pulkit Samrat) यांनी लग्नगाठ बांधली आहे. दोघांचा लग्नसोहळा धुमधडाक्यात पार पडला आहे. क्रिती आणि पुलकित या नवविवाहित जोडप्याने नुकतेच त्यांच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

क्रिती आणि पुलकित यांचा लूक

क्रिती आणि पुलकित यांनी शेअर केलेल्या लग्नसोहळ्याच्या फोटोमध्ये दोघेही खास लूकमध्ये दिसत आहेत. लग्नसोहळ्यासाठी क्रितीनं पिंक कलरचा लेहंगा आणि स्टोनची ज्वेलरी असा लूक केला होता. तर पुलकितनं लग्नसोहळ्यात सी ग्रीन कलरची शेरवानी परिधान केली होती. पुलकितच्या शेरवानीच्या डिझाईननं अनेकांचे लक्ष वेधले होते.

शेअर केले फोटो

क्रिती खरबंदा आणि अभिनेता पुलकित सम्राट यांनी त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करुन त्याला खास कॅप्शन दिलं आहे. फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं,

"From the deep blue sky,
To the morning dew.
Through the low and the high,
It’s only you.
From the start to the end,
In every now and every then,
When my heart beats different,
It’s got to be you.
Constantly,
Consistently,
Continually,
You!"

2014 मध्ये पुलकितनं श्वेता रोहिरासोबत लग्न केले होते. श्वेता ही सलमान खानची 'राखी सिस्टर' आहे. पण पुलकित आणि श्वेता यांचा संसार फार काळ टिकला नाही. पुलकित आणि श्वेता यांनी 2015 मध्ये घटस्फोट घेतला.

पुलकित आणि क्रितीचे चित्रपट

वीरे की वेडिंग आणि तैश या चित्रपटांमध्ये क्रिती आणि पुलकित यांनी काम केलं आहे. पण पागलपंती या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान क्रिती आणि पुलकित हे एकमेकांच्या प्रेमात पडले. फुकरे, फुकरे रिटर्न्स, जय हो या चित्रपटात पुलकितनं काम केलं. तर हाऊसफुल 4, यमला पगला दिवाना, शादी में जरूर आना या चित्रपटात क्रितीनं काम केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com