'आदीपुरुष'साठी ओम राऊत यांना नाही मिळाली त्यांच्या पसंतीची सीता, आता 'या' अभिनेत्रीसोबत करणार शूटींग सुरु

दिपाली राणे-म्हात्रे
Saturday, 28 November 2020

प्रभास सारख्या तगड्या अभिनेत्यासमोर या अभिनेत्रीचा टिकाव कसा लागणार अशी चर्चा आता सिनेइंडस्ट्रीत सुरु झाली आहे. 

मुंबई- दीपिका पदूकोण, अनुष्का शर्मा पासून अनेक ए लिस्टर अभिनेत्रींचा नकार ऐकल्यानंतर आता दिग्दर्शक ओम राऊत यांना 'आदिपुरुष' या त्यांच्या आगामी सिनेमासाठी नवीन सीता मिळाली आहे. मात्र प्रभास सारख्या तगड्या अभिनेत्यासमोर या अभिनेत्रीचा टिकाव कसा लागणार अशी चर्चा आता सिनेइंडस्ट्रीत सुरु झाली आहे. 

हे ही वाचा: जेव्हा लता मंगेशकर यांना मारण्यासाठी दिलं गेलं होतं विष, वाचा लतादीदींनी सांगितलेला किस्सा  

दिग्दर्शक ओम राऊत यांच्या सिनेमात प्रभास राम तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत आहे. कित्येत दिवसांपासून या सिनेमासाठी सीतेचा शोध सुरु आहे मात्र अखेर ओम राऊत यांना अभिनेत्री कृती सॅननच्या नावावर समाधान मानावं लागलं आहे. कृतीचा 'पानिपत' या सिनेमातील अभिनय जरी प्रेक्षकांना आवडला असला तरी या सिनेमात प्रभाससमोर तिचा टिकाव कसा लागेल अशी चर्चा आता सुरु झालीये.

कृतीला या सिनेमासाठी विचारल्यानंतर तिने लगेचच होकार दिल्याचं कळतंय. या सिनेमाची शूटिंग जानेवारीमध्ये सुरु होईल. 'आदिपुरुष' या सिनेमाचं जास्तीत जास्त शूटिंग स्टुडिओमध्ये होणार असल्याचं कळतंय. बाहुबली स्टाईलमध्ये हे शूट केलं जाईल. जास्तीत जास्त लोकेशन्स स्पेशल इफेक्ट्स आणि वीएफएक्सने तयार केले जातील. हा सिनेमा थ्रीडी मध्ये बनणार आहे.

अभिनेत्री कृती सॅनन सध्या चंदीगढमध्ये अभिनेता राजकुमार रावसोबत 'हम दो हमारे दो' या सिनेमाची शूटींग करत असल्याची चर्चा आहे. जानेवारीमध्ये अक्षय कुमारसोबत बच्चन पांडे या सिनेमाचं शूट देखील ती सुरु करणार होती मात्र आता कृतीने या तारखा आदिपुरुषसाठी दिल्या असल्याचं कळतंय.  

kriti sanon play sita in prabhas adipurush saif ali khan as lankesh  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kriti sanon play sita in prabhas adipurush saif ali khan as lankesh