Kriti Sanon Viral Video : क्रितीनं प्रेमानं नेटकऱ्यांना जिंकून घेतलं! ज्या चाहत्याला बॉडीगार्डनं हटकलं अभिनेत्रीनं त्यालाच...

बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री क्रिती सेनॉन ही नेहमीच तिच्या स्टाईल आणि व्हिडिओमुळे चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय असते.
Kriti Sanon tells off her bodyguard after he stops fan
Kriti Sanon tells off her bodyguard after he stops fan esakal

Kriti Sanon tells off her bodyguard after he stops fan : बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री क्रिती सेनॉन ही नेहमीच तिच्या स्टाईल आणि व्हिडिओमुळे चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय असते. क्रितीचा सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ तिच्या (Kriti Sanon latest News) व्यक्तिमत्वाविषयी खूप काही सांगून जाणारा आहे. चाहत्यांना क्रितीचा तो साधेपणा भावला आहे.

आपल्या आवडत्या सेलिब्रेटींसोबत फोटो घेणे, सेल्फी काढणे हे प्रत्येकालाच आवडते. क्रितीला (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya New movie) पाहून तिच्या एका चाहत्याला तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह काही आवरला नाही. मात्र तिच्याभोवती असणाऱ्या (Viral News) सुरक्षारक्षकांनी त्याला दटावले. त्याला मागे लोटले. अशावेळी क्रितीनं जे काही केले त्यामुळे नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

सोशल मीडियावर इंस्टट बॉलीवूडचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात क्रिती त्या (Latest Entertainment News) चाहत्यासोबत सेल्फी घेताना दिसत आहे. तिचा तो साधेपणा आणि मनाचा मोठेपणा चाहत्यांना आवडला आहे. त्यांनी तिची प्रशंसा केली आहे. अनेकदा कित्येक सेलिब्रेटी चाहत्यांवरच आगपाखड करतात. मात्र क्रितीनं चाहत्याला निराश न करता त्याच्यासोबत सेल्फी घेत त्याला अनोख गिफ्ट दिल्याचं अनेकांनी म्हटले आहे.

क्रिती ही सध्या तिच्या आगामी तेरी बातो में ऐसा उलझा जिया नावाच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. त्या दरम्यान एका व्हिडिओमुळे ती चर्चेत आली आहे. यावेळी क्रिती आणि तिचा सहकलाकार शाहीद कपूर (Kriti Shahid New movie) प्रमोशनला उपस्थित होते.

क्रितीच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती गेल्या वर्षी तिचा गणपथ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र त्याला प्रेक्षकांचा म्हणावा असा प्रतिसाद काही मिळाला नाही. तो बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करण्यात अपयशी ठरला. त्या चित्रपटाच्या निमित्तानं क्रितीनं दुसऱ्यांदा टायगरसोबत स्क्रिन शेयर केली होती. यापूर्वी तिनं त्याच्यासोबत हिरोपंती नावाच्या चित्रपटात काम केले होते.

Kriti Sanon tells off her bodyguard after he stops fan
Kriti Sanon Gets Golden Visa : क्रितीला मिळाला 'गोल्डन व्हिसा'! युएईकडून खास गौरव, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, 'आता...'

गेल्या वर्षी क्रितीला मीमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यानंतर क्रितीच्या वाट्याला वेगवेगळे प्रोजेक्ट्स आले आहेत. सध्या काही दिवसांपासून तिच्या आणि शाहीदच्या तेरी बातो में ऐसा जिया चित्रपटाची चर्चा सुरु आहे. त्याच्या व्हायरल ट्रेलरला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com