Kriti Sanon Video:
Kriti Sanon Video:Esakal

Kriti Sanon: थॅक्यू बाप्पा! राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर क्रिती सहकुटुंब सहपरिवार सिद्धिविनायक मंदिरात...

National Award : क्रितीला नुकताच 2021 मध्ये आलेल्या 'मिमी' चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आता राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर क्रिती आपल्या कुटुंबासह सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली आहे.
Published on

Kriti Sanon Visits Siddhivinayak Temple With Family: बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या खुप चर्चेत आहे. तिला 'मिमी' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

या पुरस्काराची घोषणा होताच क्रितीने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. राष्ट्रीय पुरस्कार ज्युरी सदस्यांचे आभार मानत सिनेमाच्या टिमचेही आभार मानले होते.

राष्ट्रीय पुरस्कार मिळवणं ही काही साधी गोष्ट नाही. क्रितीसाठी हा खूप मोठा क्षण होता. राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर आता क्रिती सेननने शनिवारी सकाळी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले.

Kriti Sanon Video:
Hema Malini : 'संधी मिळाली तर मी पण लिपलॉक सीन देणार! धर्मेंद्र करु शकतात तर मग....', हेमा मालिनी बोलून गेल्या

क्रिती तिच्या कुटुंबासह सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली. यावेळी तिची बहीण, आई आणि वडिलांसोबत मंदिरात जाताना दिसली. एका व्हिडिओमध्ये क्रिती पिवळ्या रंगाचा सूटमध्ये दिसत आहे. देवाचा आशीर्वाद घेतल्यानंतर तिने पापाराझींना प्रसादही वाटला. तिचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Kriti Sanon Video:
Sharad Ponkshe:गांधीजींनाही मिळत होती पेन्शन! शरद पोंक्षेंनी सादर केले पुरावे

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत क्रितीने सांगितलं की, जेव्हा तिने पुरस्कार मिळवला तेव्हा ती एका मिटींगमध्ये होता. मीटिंगमध्ये तिचा फोन वाजत होता. ती मीटिंगमधुन बाहेर पडली त्यानंतर तिला ती पुरस्कार जिंकल्याचं कळालं. त्यावेळी ती खुपच भावुक झाली होती. तिने मीटिंग थांबवली आणि तिच्या कुटूंबाला भेटण्यासाठी गेली. ज्याचे स्वप्न तिने पाहिले होते आणि ज्यासाठी तिने मेहनत घेतली ते सत्यात उतरल्यानंतर ती खुपच आनंदित झाली.

तिने सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत तिच्या कुटुंबाचे आभार मानले. त्याबरोबर तिने आलिया भट्टचेही अभिनंदन केले. क्रितीने लिहिले, 'आई, बाबा आणि नुपुर, तुम्ही लोक माझी लाईफलाइन आहात! नेहमी माझ्या चीअरलीडर्स असल्याबद्दल धन्यवाद..! आलियाचे अभिनंदन! मला तुमच्यासोबत हा मोठा क्षण शेअर करायला मिळाला!'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com