'मिमी'मध्ये क्रिती सॅनन दिसणार हटक्या भूमिकेत!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

'लुकाछुपी' च्या यशानंतर क्रिती सॅननचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'मिमी' असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा पहिला पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला आहे.

मुंबई : 'लुकाछुपी' च्या यशानंतर क्रिती सॅननचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'मिमी' असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा पहिला पोस्टर सोशल मीडियावरून प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमामध्ये क्रिती एका सरोगसी आईच्या भूमिकेत दिसणार आहे.

इंस्टाग्राम अंकाउंटवरून तिने हा पोस्टर अपलोड केला आहे. ज्यामध्ये एका हातात बाळ असून दुसरा हात हे बाळ घेण्यासाठी पुढे केलेला दिसत आहे. या पोस्टला कॅप्शन देताना तिने लिहिलं आहे की, ''आयुष्यातला असा प्रवास जो अशक्य अशा चमत्कारांनी भरलेला आहे. या प्रवासासाठी तयार व्हा. ‘मिमी’ हे खूप खास असणार आहे.'' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Mimi @kritisanon 

A post shared by K R I T I S A N O N F C (@kritixsanon) on

या चित्रपटामध्ये क्रिती मुख्य भूमिका साकारणार आहे. एका अनोख्या विषयावर असणाऱ्या या सिनेमाचं पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मात्र, हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याविषयीची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

याचं आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे  'मिमी'  हा सिनेमा ‘मला आई व्हायचंय’ या मराठी सिनेमावर आधारित आहे. जो एका विदेशी आणि गरीब भारतीय महिलेच्या कथेवर आधारित आहे. या मराठी सिनेमाला 2011 चा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मिमी या सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून निर्मिती दिनेश विजान यांची आहे. क्रिती सॅननसोबत या चित्रपटामध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी दिसणार आहे. याआधी 'लुकाछुपी' मध्ये क्रिती आणि पंकज त्रिपाठी एकत्र दिसले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kriti Sanons Mimi film based on surrogacy