आमिर,शाहरुख,अजयवर ताशेरे ओढणारं केआरके चं नवं ट्वीट,अमिताभ-दिलीप कुमार यांचे उदाहरण देत म्हणालाय..KRK Tweet | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KRK Tweet on Shah rukh, Aamir Khan & Ajay Devgn

KRK Tweet:आमिर,शाहरुख,अजयवर ताशेरे ओढणारं केआरके चं नवं ट्वीट,अमिताभ-दिलीप कुमार यांचे उदाहरण देत म्हणालाय..

KRK Tweet: अभिनेता आणि कथित समिक्षक केआरके सोशल मीडियावर भलताच सक्रिय असलेला पहायला मिळतो. केआरकेच्या पोस्ट्स सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात, अशात त्याचं आता एक लेटेस्ट ट्वीट चर्चेत आलं आहे.

जिथे त्यानं शाहरुख खान,आमिर खान आणि अजय देवगणच्या फीटनेसनवर अनेक प्रश्न निर्माण करत व्हीएफक्सच्या मदतीशिवाय यांचे पान हलत नाही असं म्हटलं आहे.

तसंच आपल्या त्या ट्वीटमध्ये केआरकेनं अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांचा देखील उल्लेख केला आहे.(Krk tweeted shahrukh khan ajay devgn aamir khan are blessed with vfx technology)

केआरके नेहमीच बॉलीवूड आणि तिथल्या सेलेब्रिटींवर काही ना काही आरोप करताना दिसतो..कधी एखादं गंभीर विधान करताना दिसतो तर कधी त्यांची खिल्ली उडवताना दिसतो.

या नव्या ट्वीटमध्ये तो म्हणालाय,''हे आजकालचे अभिनेते(शाहरुख,आमिर खान आणि अजय देवगण) व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा फायदा घेत वयाच्या ५८ व्या वर्षी देखील ३० वर्षाचे तरुण दिसतात''.

'' पण अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांच्या काळात हे अशाप्रकारचे तंत्रज्ञान फार प्रचलित नव्हते. अशामध्ये वयाच्या ५२ व्या वर्षीही त्यांना त्यांच्याच वयाच्या भूमिका साकाराव्या लागायच्या''.

केआरकेचं हे ट्वीट जोरदार व्हायरल झालं आहे.

हेही वाचा: तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या ट्वीटरवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी केआरके च्या या ट्वीटचं समर्थन केलं आहे. तर काहींनी त्याला ट्रोल केलं आहे.

एकानं कमेंट केली आहे की,' १०० ट्क्के खरंय हे.' तर आणखी एकानं लिहिलं आहे-'आजकालचे स्टार्स एक्सरसाइज,डाएट आणि फिटनेसची खूप काळजी घेतात. तेव्हा ते १० वर्ष छोटे दिसतात..40 च्या वयात तीशीचे दिसतात'.

तर आणखी एका ट्वीटर यूजरने लिहिले आहे- 'भावा तू योग्य बोलतोयस...हे सगळे व्हीएफएक्सचा फायदा उठवत आहेत. नाहीतर सुपरस्टार केआरकेच्या चार्मसमोर कोणाची हिम्मत टिकण्याची'.

तर आणखी एकानं मुद्दामहून कमेंट करत लिहिलंय- 'बरं ते सगळं राहू..केआरके तुझा कोणता सिनेमा येतोय की नाही'.