25 लाख दे प्रमोशन करतो, कपिलची 'काश्मिर फाईल्सच्या' दिग्दर्शकाला ऑफर|KRK Video Viral Kapil Sharma | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kashmir Files

25 लाख दे प्रमोशन करतो, कपिलची 'काश्मिर फाईल्सच्या' दिग्दर्शकाला ऑफर

Bollywood Movie: द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) हा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याचे कारण द काश्मिर फाईल्सच्या (The Kashmir Files) दिग्दर्शकाला त्यानं प्रमोशनसाठी दिलेला नकार. यामुळे त्या (Bollywood Movies) दिग्दर्शकानेच विवेक अग्निहोत्री यांनी त्याच्या शो मध्ये (Bollywood News) जाण्यास नकार दिला आहे. आज द काश्मीर फाईल्स नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याची सगळीकडे चर्चा आहे. मात्र कपिल शर्मा च्या शो मध्ये नाकारलं गेल्यानं द काश्मिर फाईल्सविषयी सगळीकडे बोलले जाऊ लागले आहे. केकेआरनं आता एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामध्ये त्यानं कपिलनं विवेक अग्निहोत्री यांच्याकडे प्रमोशनसाठी 25 लाख रुपये मागितल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

कमाल खान हा त्याच्या वादग्रस्त स्वभावासाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी आहे. तो आपल्या रिव्ह्युतून चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. त्यानं काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या अंतिम चित्रपटाचा रिव्ह्यु केला होता. त्यावरुन रागाला गेलेल्या सलमाननं त्याच्या विरोधात कोर्टामध्ये केआकेच्या विरोधात याचिका दाखल केली होती. मात्र तरीही केआरके हा काही शांत बसलेला अभिनेता नाही. त्यानं त्यानंतर अनेक बॉलीवूड चित्रपटांचा रिव्ह्यु केल्याचे दिसून आले होते. आता तो कपिल शर्मा आणि विवेक अग्निहोत्री यांच्या वादात पडला आहे. त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ तयार केला आहे. त्यातून सध्याच्या द काश्मिर फाईल्सवरुन वाद का झाला आहे हे सांगितलं आहे.

हेही वाचा: Video Viral: युद्ध परिस्थितीतही युक्रेनियन सैनिक म्हणतायत Don’t Worry Be Happy!

केआरकेनं त्य़ाच्या एका व्हिडिओतून अग्निहोत्री यांनी नकार का दिला असावा याविषयी काही अंदाज व्यक्त केला आहे. विवेक अग्निहोत्री यांनी व्टिट करुन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. यासगळ्या परिस्थितीवर केआरकेनं व्हिडिओतून नेटकऱ्यांना काय झाले असावे असा अंदाज व्यक्त केला आहे. त्या व्हिडिओमध्ये केआरके म्हणतो, त्यानं यावेळी पहिल्यांदा द काश्मिर फाईल्स चित्रपटाच्या नावाचा उल्लेख केला आहे. तो शो काही कपिल शर्माचा नाही. कपिल शर्मा हा केवळ अॅक्टिंगचे पैसे घेतो आणि घर चालवतो. त्यामुळे सगळं काही कपिल शर्माच्या हातात नाही. ते ठरवणारे वेगळे आहेत. असं झालं असेल की, संबंधित वाहिनीच्या वतीनं ती पीआर टीम कपिल शर्माला पैशांसाठी विचारले असेल, त्यावेळी 25 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप केआरकेनं केला आहे. आणि अग्निहोत्रीनं सांगितलं असेल की, आमच्या चित्रपटाचे बजेट कमी आहे. त्यामुळे आम्हाला प्रमोशनसाठी एवढा पैसा खर्च करता येणार नाही. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे कमाल खाननं सांगितलं आहे.

Web Title: Krk Video Viral Kapil Sharma Demand Money To The Kashmir Files Director

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top