Video Viral: युद्ध परिस्थितीतही युक्रेनियन सैनिक म्हणतायत Don’t Worry Be Happy!

Video Viral: युद्ध परिस्थितीतही युक्रेनियन सैनिक म्हणतायत Don’t Worry Be Happy!

रशिया युक्रेनदरम्यान गेल्या १४ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. २४ फेब्रुवारी रोजी रशियन सैन्याने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून युक्रेनमध्ये अराजकता निर्माण झाली आहे. त्यानंतर युक्रेनमधील काही फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. आता, बॉबी मॅकफेरिनचे डोन्ट वरी बी हॅप्पी हे गाणे युक्रेनियन लष्करी बँड वाजवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Video Viral: युद्ध परिस्थितीतही युक्रेनियन सैनिक म्हणतायत Don’t Worry Be Happy!
बाबा वेंगा यांनी रशियासंदर्भात काय भविष्यवाणी केलीये माहितीये?

या व्हिडिओमध्ये लष्करी गणवेशातील पाच ब्रास वाजवणारे कलाकार ओडेसा ऑपेरा आणि थिएटरचे रक्षण करताना डोन्ट वरी बी हॅपी वाजवित आहेत. बॅण्ड वाजत असताना पाठीमागे युक्रेनियन ध्वज फडकत असल्याचे दिसते आहे. पाठीमागे काही अंतरावर ओडेसा ऑपेरा आणि बॅलेट थिएटरही दिसते आहे. Bobby McFerrin यांनी डोन्ट वरी बी हॅपी हे गाणे गायले असून त्यांनी हा व्हिडिओ त्याच्या युट्यूबवर शेअर केला आहे. त्यानंतर नेटिझन्सनी या कलाकारांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

Video Viral: युद्ध परिस्थितीतही युक्रेनियन सैनिक म्हणतायत Don’t Worry Be Happy!
युद्धातही जपली माणुसकी! भारतीय मुलाने पाकिस्तानी मुलीला बॉम्बपासून वाचवले

युद्धामुळे आतापर्यंत, दोन दशलक्ष नागरिक युक्रेनमधून पळून गेले आहेत. युक्रेनचे अध्यक्ष Volodymyr Zelenskyy यांनी मंगळवारी मानवतावादी कॉरिडॉरचा विस्तार करण्याचे आवाहन केले. तसेच एक नवीन व्हिडिओ शेअर करत लोकांना रशियाच्या हल्ल्याचा प्रतिकार करत राहण्याचे आवाहन केले.

Video Viral: युद्ध परिस्थितीतही युक्रेनियन सैनिक म्हणतायत Don’t Worry Be Happy!
आम्हाला मुलबाळ नकोच... का म्हणतात महिला असं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com