कपिल शर्माच्या शो मध्ये 'तो' पुन्हा येतोय...

गेल्या महिन्यात कृष्णानं एक व्हि़डिओ शेअर केला होता.
krushna abhishek
krushna abhishek team esakal

मुंबई - टेलिव्हिजनवरील प्रसिध्द कॉमेडी शो (commedy show) म्हणून द कपिल शर्मा शो (the kapil sharma show) सर्वांना माहिती आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. गेल्या काही महिन्यांपासून या शो बद्दल सोशल मीडियावर (social media) वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या. आतापर्यत या मालिकेतील दोन कलाकारांनी पुन्हा त्या शो मध्ये काम करण्यास नकार दिला आहे. त्याचे कारण शो चा होस्ट कपिल शर्माच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ( krushna abhishek hints the kapil sharma show returning to tv soon shares funny throwback video )

कपिल शर्मा शो मधील प्रसिध्द कलाकार कृष्णा अभिषेकनं (krushna abhishek) देखील आपण पुन्हा या शो मध्य़े येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे आणि कपिलचे वाद झाले होते. कपिलचे (kapil) आणि सुनील ग्रोव्हरचेही (sunil grover) वाद झाले होते. हा वाद इतका टोकाला गेला की त्यामुळे त्यानं पुन्हा त्या मालिकेत कामच कराय़चे नाही असा निर्णय घेतला होता. सुनीलच्या चाहत्यांनी देखील त्याला पुन्हा त्या मालिकेत काम करण्यासाठी गळ घातली होती. पण त्याचा नकार कायम आहे.

आता अभिनेता कृष्णानं त्याच्या शो च्या पहिल्या एपिसोडची एक क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यात रणवीर सिंग आणि सारा अली खान सहभागी झाले होते. सिम्बा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते आले होते. कृष्णानं आता कपिल शर्मा शो चा दुसरा सीझन जॉईन केला आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

krushna abhishek
Video: 'सरसेनापती हंबीरराव' मधील महाराजांचे सिंहासनाधिश्वर दर्शन
krushna abhishek
अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

गेल्या महिन्यात कृष्णानं एक व्हि़डिओ शेअर केला होता. त्यात त्यानं लिहिलं होतं की, आपण कपिलच्या शो ला किती मिस करतो आहोत. आता त्यानं एक व्हिडिओ शेअर करुन परत येण्याचे संकेत दिले आहेत. त्या व्हिडिओला कॅप्शन देताना त्यानं लिहिलं आहे की, शो च्यावेळेस जी धमाल यायची तिला मी मिस करतो आहे. आता मला जास्त वेळ वाट पाहायची नाही. तुमच्या सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी मी तयार आहे. असेही त्यानं लिहिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com