
या एपिसोडचे दोन प्रोमो रिलीज केले आहेत. यामध्ये कपिल शर्मासोबत कीकू शारदा, चंदन प्रभाकर आणि सुमौना चक्रवर्ती दिसत आहेत. मात्र कृष्णा अभिषेक यात कुठेच दिसून येत नाहीये आणि हीच गोष्ट चाहत्यांच्या नजरेत सापडल्याने त्यांना हे खटकतंय.
मुंबई- प्रसिद्ध टीव्ही शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये या आठवड्यात एक मोठा धमाका होणार आहे. बॉलीवूडचा हिरो नंबर वन गोविंदा यावेळी कपिल शर्मा शोमध्ये येणार आहे. या एपिसोडचे कित्येक प्रोमो वाहिनीने त्यांच्या सोशल मिडियावर शेअर केले आहेत. मात्र सगळ्या व्हिडिओंमध्ये एक व्यक्ती दिसत नाहीये आणि ती व्यक्ती म्हणजे कृष्णा अभिषेक.
हे ही वाचा: 'आरआरआर'चे दिग्दर्शक एस.राजामौली दिवाळीच्या निमित्ताने चाहत्यांना देणार 'हे' गिफ्ट
वाहिनीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या एपिसोडचे दोन प्रोमो रिलीज केले आहेत. यामध्ये कपिल शर्मासोबत कीकू शारदा, चंदन प्रभाकर आणि सुमौना चक्रवर्ती दिसत आहेत. मात्र कृष्णा अभिषेक यात कुठेच दिसून येत नाहीये आणि हीच गोष्ट चाहत्यांच्या नजरेत सापडल्याने त्यांना हे खटकतंय.
त्याचं झालं असं की कृष्णा अभिषेक आणि त्याचा मामा गोविंदा यांच्यामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून वाद सुरु आहे. गोविंदा अनेकदा कपिल शोमध्ये येऊन गेला आहे मात्र जेव्हा पण गोविंदाची या शोमध्ये एंट्री होते तेव्हा कृष्णा अभिषेकची एक्झिट होताना पाहायला मिळते. मिडिया रिपोर्ट्सनुसार गोविंदाला कृष्णा अभिषेक त्यांच्या समोर येऊ नये असं वाटत असल्याचं म्हटलं जातंय.
ही गोष्ट चाहत्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हा प्रोमोवर कमेंट करायला सुरुवात केलीये. एकाने म्हटलंय, ''जेव्हा कधी गोविंदा येतो तेव्हा कृष्णा गायब होतो.'' दुस-याने म्हटलंय, ''मामा समोर भाचा का येत नाही? मागच्या वेळीही असंच झालं होतं. हे लोक असं का करतात?''
krushna abhishek missing when govinda reaches in the kapil sharma show