esakal | "गोविंदा मामा असेल तर मी काम नाही करणार"; कृष्णा अभिषेकचा साफ नकार
sakal

बोलून बातमी शोधा

govinda krishna

"गोविंदा मामा असेल तर मी काम नाही करणार"; कृष्णा अभिषेकचा साफ नकार

sakal_logo
By
स्वाती वेमूल

कॉमेडियन कृष्णा अभिषेक Krushna Abhishek आणि त्याचा मामा गोविंदा Govinda यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहे. या मतभेदांमुळेच कृष्णाने 'द कपिल शर्मा शो'च्या The Kapil Sharma Show आगामी भागात काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. कारण त्या एपिसोडमध्ये गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा हजेरी लावणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून या दोन कुटुंबांमध्ये बरेच वाद झाले असून अनेकदा दोघांनी माध्यमांमध्ये एकमेकांबद्दल कटुता व्यक्त केली आहे. एपिसोडमध्ये गोविंदाची हजेरी असल्याने कृष्णाने याआधीही काम करण्यास कपिल शर्माला नकार दिला होता.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कृष्णा म्हणाला, "गेल्या १५ दिवसांपासून मी मुंबई आणि रायपूर असा सतत प्रवास करतोय. माझ्या चित्रपटाची शूटिंग सुरू असल्याने सध्या माझं शेड्युल व्यग्र आहे. कपिल शर्माच्या शोसाठी मी नेहमीच तारखांची तडजोड केली आहे. पण आगामी एपिसोडमध्ये मला कळलंय की ते दोघं हजेरी लावणार आहेत. त्यामुळे मी त्या एपिसोडमध्ये काम करण्यास नकार दिला आहे. मला असं वाटतं की त्यांची पण हीच इच्छा असेल की मी तिथे नसावं. हे माझ्याकडूनही असेल आणि त्यांच्याकडूनही. कारण हा एक कॉमेडी शो आहे. एखादी वादग्रस्त गोष्ट तोंडून निघून गेली ऐनवेळी तर पुन्हा चर्चा सुरु होईल. मला पुन्हा वाद सुरू करायचा नाही. गोविंदाजी स्टेजवर असताना मी कॉमेडी करावी अशी प्रेक्षकांची इच्छा असेल. पण त्या एपिसोडमध्ये मी हजेरी न लावणंच योग्य आहे."

हेही वाचा: सलमान-कतरिनाने घेतली तुर्कीतल्या मंत्र्यांची भेट

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात गोविंदाने कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. तेव्हासुद्धा कृष्णाने त्या एपिसोडमध्ये काम करण्यापासून माघार घेतली. कृष्णाची पत्नी कश्मीराने केलेल्या एका ट्विटनंतर दोन कुटुंबीयांमध्ये वाद सुरू झाला. 'पैशांसाठी लोकं नाचतात', असं तिने तिच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. तेव्हापासून गोविंदा आणि कृष्णामध्ये अनेकदा शाब्दिक बाचाबाची झाली.

loading image
go to top