esakal | कृष्णाला मामा बरोबर भांडण मिटवायचय, पण मामीला त्याचा चेहराही पाहायचा नाहीय
sakal

बोलून बातमी शोधा

कृष्णाला मामा बरोबर भांडण मिटवायचय, पण मामीला त्याचा चेहराही पाहायचा नाही

कृष्णाला मामा बरोबर भांडण मिटवायचय, पण मामीला त्याचा चेहराही पाहायचा नाही

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: अभिनेता गोविंदा (Govinda) आणि कृष्णा अभिषेकमध्ये (Krushna Abhishek) मामा-भाच्याच नातं आहे. पण मागच्या काही वर्षांपासून हे नातं बिघडलं असून दोन्ही कुटुंबांमध्ये विसंवाद आहे. कृष्णा अभिषेक मामा गोविंदाप्रमाणे विनोदी अभिनयामध्ये माहीर आहे. गोविंदा आणि सुनिता अहुजा मामा-मामी बरोबरचे संबंध लवकरच सुधारतील, अशी अपेक्षा कृष्णा अभिषेकने व्यक्त केली आहे.

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने फोटोग्राफर्सशी बोलताना कृष्णा अभिषेकने मामी सुनिता अहुजा यांच्या मुलाखतीचा दाखल देऊन कुटुंबातील अंतर्गत मतभेदांवर मार्ग निघावा, हीच प्रार्थना असल्याचे सांगितले. "आज सकाळीच मामा-मामींची बातमी वाचली. जी काही समस्या आहे, ती गणपती बाप्पांनी दूर करावी. अंतर्गत मतभेद असले, तरी आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. हे जे काही मतभेदाचे मुद्दे आहेत, त्यावर लवकरच तोडगा निघावा हीच प्रार्थना आहे" असे कृष्णा तिथे उपस्थित असलेल्या फोटो ग्राफर्सना म्हणाला.

हेही वाचा: Sakianaka rape case update: पीडित महिलेवर अनैसर्गिक अत्याचार

काय आहे प्रकरण

कपिल शर्मा शो मध्ये गोविंदा आणि सुनिता अहुजा सहभागी होणार होत्या. पण कृष्णा अभिषेकला हे समजल्यानंतर त्याने त्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. सुनिता अहुजा यांनी या विषयावर एका आघाडीच्या दैनिकाशी बोलताना कृष्णा अभिषेकच्या या कृतीमुळे आपण खूप अस्वस्थ आहोत, शब्दात व्यक्त होऊ शकत नाही असे सांगितले.

हेही वाचा: मुंबई: आज चौपाटीवर गेल्यास असं होणार गणेश मुर्तीचं विसर्जन

दोन्ही कुटुंबांमध्ये समेट अजिबात होणार नाही असे सुनिता अहुजा यांनी सांगितले. "असं कधी घडणार नाही. तीन वर्षांपूर्वीच मी सांगितलय. मी जिवंत असेपर्यंत तरी तोडगा निघणार नाही. कुटुंबाच्या नावावर तुम्ही कोणाशी गैरवर्तन, अपमान करु शकत नाही. आम्ही त्यांना लहानाचं मोठं केलं. हे भांडण मिटणार नाही. मला माझ्या आयुष्यात पुन्हा त्याचा चेहरा सुद्धा पाहायचा नाहीये" असे सुनिता अहुजा यांनी स्पष्टपणे सांगितलं.

loading image
go to top