Satish Kaushik: सतीश कौशिक यांच्या निधनानंतर कुशल बद्रिके म्हणाला, यावर्षी आमचं कॅलेंडर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kushal badrike shared emotional post after satish kaushik died

Satish Kaushik: सतीश कौशिक यांच्या निधनानंतर कुशल बद्रिके म्हणाला, यावर्षी आमचं कॅलेंडर..

Satish Kaushik death: बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी पहाटे वयाच्या 66 व्या वर्षी निधन झाले. सतीश कौशिक यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. कारण सतत हसणारे आणि हसवणारे सतीश कौशिक यांची अचानक एक्झिट सगळ्यांच्याच जिव्हारी लागली आहे.

सतीश कौशिक आणि अभिनयासोबत दिग्दर्शन आणि निर्मितीही केली. त्यांनी 100 हून अधिक चित्रपटात अभिनय तर 20 हून अधिक चित्रपट दिग्दर्शित केले. बॉलीवुडमध्ये त्यांची दोस्ती यारी मोठी आहे. त्यांच्या आनंदी आणि गोड स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार प्रचंड मोठा आहे.

सतीश यांच्या निधनानंतर बॉलिवूडसह मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी देखील दु:ख व्यक्त केलं आहे. मराठमोळा अभिनेता  कुशल बद्रिकेने देखील सतीश यांचा फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहित त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

(kushal badrike shared emotional post after satish kaushik died)

सतीश कौशिक यांना खरी ओळख मिळाली ती त्यांच्या 'कॅलेंडर' या पात्रामुळे. अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी अभिनित ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटात सतीश कौशिक यांनी ‘कॅलेंडर’ ही भूमिका साकारली होती.

त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली होती. आजही सतीश कैशिक म्हटलं की मिस्टर इंडिया' मधील 'कॅलेंडर' चा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. आज त्याच भूमिकेची आठवण अभिनेता कुशल बद्रिकेला झाली आहे.

आज कुशलने सतीश कौशिक यांचा फोटो शेयर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यानं म्हटलं आहे की, 'या वर्षी आमचं calendar हरवलं यार...' कुशलच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सतीश कौशिक हे अभिनेता, कॉमेडियन, स्क्रिप्ट रायटर, दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणामध्ये झाला. त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी नाटकांमध्ये काम केलं. 1987 मध्ये रिलीज झालेल्या मिस्टर इंडिया चित्रपटामुळे त्यांनी विशेष ओळख मिळाली. तसेच दीवाना मस्ताना, राम लखन आणि साजन चले ससुराल या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. 

टॅग्स :Bollywood News