Kushal Badrike : कुशल बद्रिकेने खाल्ला मार! अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kushal Badrike

Kushal Badrike : कुशल बद्रिकेने खाल्ला मार! अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल

'चला हवा येऊ द्या'तील अभिनेता कुशल बद्रिके आपल्या अभिनयाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हसवत असतो. तो सोशल मीडियावर विनोदी व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यात त्याला त्याचीच मित्र मारहाण करत असल्याचे दिसतायत. नेमक अस काय घडल की त्याचीच मित्र त्याला मारायला लागले आहेत. तर अस की व्हिडिओमध्ये विजू माने, अभिजीत चव्हाण आणि संतोष जुवेकर दिसतात. (kushal badrike struggler saala funny video goes viral)

कुशल बद्रिके (Kushal Badrike) एक चूक करतो आणि ते तिघेही त्याला मारतात. मला तर काय कळलच नाही. त्यांनी मला का मारले ते, अशी कॅप्शन देत त्याने व्हिडिओ शेअर केला आहे. 'स्टगलर साला' या (Struggler Saala) वेब सीरिजची पटकथा वाचण्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. वेब सीरिजचे सध्या चित्रीकरण सुरु आहे. (Marathi Entertainment)

पटकथा वाचताना कुशलकडून चूक होते. तो विनोदी शैलीत पटकथा वाचायला जातो आणि त्यामुळे त्याला मार खावा लागतो. मात्र त्याला झालेली मारहाण ही खोटी असून ती मस्करी आहे.