
कसे प्रश्न विचारतो हा? करिनासमोर आमिर खानने करण जोहरला सुनावले
करण जोहरच्या 'काॅफी विथ करण पर्व ७' कार्यक्रमात यंदा विशेष दोन पाहुणे येणार आहेत. या कार्यक्रमाचा भाग येणाऱ्या गुरुवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो करण जोहरने (Karan Johar) सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) आणि अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हे दोघे 'काॅफी विथ करण 7 'मध्ये (Koffee With Karan) दिसणार आहेत. या प्रोमोत करण क्वाॅलिटी सेक्सविषयी प्रश्न आमिरला आणि करिनाला विचारतो. करिना करणला म्हणते तू याबाबत चांगल उत्तर देऊ शकतो. त्यावर तो म्हणतो माझी आई हा शो पाहत आहे. (koffee with karan 7 promo kareena kapoor and aamir khan karan johar)
हेही वाचा: लोक मला हिणवायचे, म्हणायचे की तुझ्याकडे रंग नाही - हेमांगी कवी
दुसरीकडे आमिर करणला म्हणतो तू जेव्हा इतरांच्या सेक्सविषयी बोलतो त्यावेळी तुमच्या आईला काही वाटत नाही का? करणकडे पाहून आमिर खान म्हणतो कसे प्रश्न विचारत आहे? इन्स्टाग्रामवरील थर्स्टी फोटो काय असतात असा प्रश्न आमिर खान करण जोहरला विचारतो. तू जेव्हा शो करतो तेव्हा कोणाचा ना कोणाचा अपमान होतो. कोणी ना कोण रडतोच. (Entertainment News)
हेही वाचा: Genelia D'Souza : व्वा...व्वा जेनेलिया डिसूझा !
सर्वांचे कपडे तर हा उतरवत असतो, असा टोला आमिर खान करणला लगावतो. किती वेळा अपमान करतय राव ही अस आमिर करिनाला म्हणताना कार्यक्रमाच्या प्रोमोत दिसत आहे.
Web Title: Koffee With Karan 7 Promo Kareena Kapoor And Aamir Khan Karan Johar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..