पोलिसांची टिंगल उडवणं कुशल बद्रिके अन् भाऊ कदमला पडलं महागात!. Chala Hawa Yevu Dya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chala Hawa Yevu dya Set. Kushal Badrike And Bhavu Kadam

पोलिसांची टिंगल उडवणं कुशल बद्रिके अन् भाऊ कदमला पडलं महागात!

'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yevu Dya) या कार्यक्रमाने गेली अनेक वर्ष आपला दबदबा छोट्या पडद्ययावर कायम ठेवला आहे. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग हा केवळ मराठी भाषिक प्रेक्षक नाही तर हिंदी भाषिक प्रेक्षकही आहे. जगातील कानाकोपऱ्यात हा शो मोठ्या आवडीनं पाहिला जातो. या शो चे दोन हिरे म्हणजे एक भाऊ कदम(Bhavu Kadam) आणि दुसरा कुशल बद्रिके(Kushal Badrike). या दोघांनी अनेकवेळा आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळवून हसवले आहे. काहीच दिवसांपूर्वी या दोघांचा 'पांडू' सिनेमा प्रदर्शित झाला. ज्या सिनेमाने कोरोनाच्या प्रादुर्भावातही बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली. या सिनेमातील गाणी आणि विनोदी दृश्यांनी तर प्रदर्शनाआधीच प्रोमो च्या माध्यमातून सोशल मीडियावर प्रशंसा मिळवलेली आपण सर्वांनीच पाहिली असेल. पण आता असं काय झालं आहे की याच 'पांडू' सिनेमातील एका दृश्यामुळे थेट या दोन कलाकारांना अटक करायला पाोलिस पोहोचले ते थेट 'चला हवा येऊ द्या' च्या सेटवर.

पोलिस येऊन कुशल आणि भाऊला अटक करतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला अन् हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. त्याचं झालं असं की,नेहमीप्रमाणे 'चला हवा येऊ द्या' च्या सेटवर सगळी टीम ही शूटिंगच्या आधीच्या तालमीसाठी बसली होती. तालीम करताना थट्टा-मस्करी सुरू असताना तिथे काशिमिरा पोलिस ठाण्यातील पोलिस पोहोचले. त्यांनी कुशल अन् भाऊला बोलावून घेतले. 'पांडू' सिनेमातील पोलिसांच्या ट्रेनिंगवर एक दृश्य आहे ज्यावर कुणीतरी माजी पोलिस अधिकाऱ्यांनी आक्षेप घेत तक्रार दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितले. त्यावर बिचारे घाबरलेले कुशल आणि भाऊ समजावून सांगू लागले असं काही नाही. आपण सिनेमा पहा आणि ठरवा. पोलिसांचा आम्ही खूप आदर करतो आणि तेच सिनेमातही सांगण्यात आलंय वगेेरे,वगेैरे. शेवटी घाबरलेल्या भाऊ-कुशलची दया येऊन सेटवरील इतर उपस्थित खो-खो हसले अन् शो चे सर्वेसर्वा असलेल्या डॉ.निलेश साबळेंनी हा एक प्रॅंक होता हे घोषित केलं. इथे बातमीत हा मजेदार व्हिडीओ जोडलेला आहे तो नक्की पहा.

Web Title: Kushal Badrikebhavu Kadam Arrested By Polic On Chala Hawa Yevu Dya Set Prank Video Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top