Kuttey: 'हमारी फौज आ रही है' कुत्तेची रिलीज डेट जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kuttey Movie News

Kuttey: 'हमारी फौज आ रही है' कुत्तेची रिलीज डेट जाहीर

Kuttey Trailer: बॉलीवूडमध्ये कायम आपल्या वेगळेपणानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारे दिग्दर्शक म्हणून विशाल भारद्वाज यांचे नाव घेता येईल. संगीतकार ते दिग्दर्शक असा त्यांचा प्रवास मोठा थक्क करणारा आहे. जगप्रसिद्ध साहित्यिक विल्यम शेक्सपियरचे फॅन असणाऱ्या भारद्वाज यांच्या चित्रपटांचा चाहतावर्ग मोठा आहे. आता त्यांचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये अर्जुन कपूर हा मुख्य भूमिकेत आहे.

लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सदद्वारा निर्मित आणि टी-सीरीटीजद्वारे प्रस्तुत असलेल्या 'कुत्ते'या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. थरार आणि मनोरंजनाने भरपूर असलेल्या 'कुत्ते'या चित्रपटात अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन आणि शार्दुल भारद्वाज यांच्यासह प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे.

हेही वाचा: का हवे विचारांचे नियम आणि वास्तविक भान !

कुत्ते'हा एक केपर-थ्रिलर असून, विशाल भारद्वाजचा मुलगा आसमान भारद्वाजच्या दिग्दर्शनातील हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट १३ जानेवारी २०२३ला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. आसमान आणि विशाल भारद्वाजद्वारा लिखित, हा चित्रपट डार्क-कॉमेडी असून, आपल्या पोस्टर लाँचने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. तसेच, चित्रपटाचे संगीत विशाल भारद्वाज यांनी दिले आहे, तर त्यांचे सहकारी गुलजार यांनी गीते लिहिली आहेत.

हेही वाचा: Swara Bhasker: 'याच्यापेक्षा मोठं...' ट्रोलर्सला उत्तर देताना स्वरा भलतचं बोलली

'कुत्ते'या चित्रपटाचे दिग्दर्शन आसमान भारद्वाज यांनी केले आहे. गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांच्या टी-सीरीटीजद्वारे प्रस्तुत, तसेच लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज निर्मित हा चित्रपट पुढीलवर्षी १३ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: Mahesh Manjrekar: मांजरेकरांचा मावळा 'सत्या' का होतोय ट्रोल?