Boycott Lal Singh Chaddha: आमिर विरोधात गुन्हा दाखल, 'इंडियन आर्मी'चा केला अपमान!

आमिरच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्लीतील एका पोलीस ठाण्यामध्ये आमिरवर कलम 153, 153 अस 298 आणि 505 यांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
Laal singh chaddha aamir khan movie news
Laal singh chaddha aamir khan movie news esakal

Laal Singh Chaddha Movie: बॉलीवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरच्या मागे लागलेला वाद हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्याच्या लाल सिंग चढ्ढावर (fir against aamir khan) सोशल मीडियातून बहिष्काराची मागणी घालण्यात आली होती. काल त्याचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात भारतीय सैन्याचा (bollywood movies) अपमान केल्याची चर्चा होती. याप्रकरणी आता आमिरची डोकेदुखी आणखी वाढल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आल्याच माहिती सुत्रांनी दिली आहे. अद्वेत चंदन दिग्दर्शित लाल सिंग चढ्ढाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले आहे. गेल्या दहा वर्षातच पहिल्यांदाच आमिरच्या एखाद्या चित्रपटाला एवढ्या कमी प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे.

एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, आज आमिरच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्लीतील एका पोलीस ठाण्यामध्ये आमिरवर कलम 153, 153 अस 298 आणि 505 यांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. काल इंग्लंडच्या माँटी पानेसरनं ट्विट करुन आमिरनं त्याच्या चित्रपटातून समस्त शीख बांधव आणि भारतीय सैन्य दलाचा अपमान केल्याची पोस्ट केली होती. ती पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाली होती. त्याच्यावरुन आमिरला ट्रोल देखील कऱण्यात आले होते. दिल्ली पोलीस कमिशनर संजय अरोरा यांनी दिलेल्या माहितीमध्ये दिल्लीतील एका वकिलानं आमिरच्या विरोधात तक्रार दिली आहे. आमिरनं त्याच्या चित्रपटातून भारतीय सैन्य दल आणि हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यातून करण्यात आला आहे.

वकील विनित जिंदाल यांनी आमिरच्या विरोधात तक्रार दिली आहे. केवळ आमिरच नाही तर त्या चित्रपटाचे दिग्दर्शक अद्वैत चंदन यांच्याविरोधात देखील तक्रार देण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये निर्मात्यांनी जाणीवपूर्वक काही वेगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एखादी दिव्यांग व्यक्ती ही भारतीय सैन्यात भरती होते. ती कारगील युद्धात सहभागी होते. आता अशा परिस्थितीत भारतीय सैन्य अशा व्यक्तीला कोणत्या निकषांच्या आधारे सहभागी करुन घेईल याचे उत्तर निर्माते आणि अभिनेत्यानं द्यावं असे तक्रारदारानं म्हटले आहे.

या चित्रपटामध्ये हिंदूच्या भावना दुखावण्यात आला आहे याविषयी तक्रारदाराचे म्हणणे आहे की, लाल सिंगमधील एका सीनमध्ये पाकिस्तानी सैनिक त्याला विचारतो की, तुला नमाज किंवा पुजा करायला मी परवानगी देतो. त्यावर आमिर म्हणतो माझी आई म्हणते, यासगळ्या प्रकारच्या पुजा म्हणजे मलेरिया आहे. लाल सिंग चढ्ढाची भूमिका करणारा आमिर कोण आहे असा प्रश्न तक्रारदारानं विचारला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com