Laal Singh Chaddha Box Office Collection : लाल सिंग चड्ढाने वीकेंडला धरला वेग; मात्र... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Laal Singh Chaddha Box Office collection

Box Office Collection : लाल सिंग चड्ढाने वीकेंडला धरला वेग; मात्र...

Laal Singh Chaddha Box Office collection आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूरचा चित्रपट लाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha) ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. मात्र, चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन निराशाजनक आहे. बॉयकॉट ट्रेंडचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर स्पष्टपणे दिसून येतो. मात्र, वीकेंडला चित्रपटाची कमाई थोडी वाढली आहे. ज्यामुळे चाहत्यांना आणि निर्मात्यांना नवीन आशा निर्माण झाल्या आहेत.

लाल सिंग चड्ढाच्या वीकेंड कलेक्शनमध्ये थोडी वाढ झाली आहे. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, रविवारी चित्रपटाने १० कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाच्या कमाईत आदल्या दिवसाच्या तुलनेत वाढ झाली आहे. मात्र, आमिरच्या चित्रपटातून ज्या प्रकारची अपेक्षा होती, त्यापेक्षा कमी आहे. तरीही चित्रपटाच्या व्यवसायात झालेली वाढ ही दिलासा देणारी बाब आहे.

हेही वाचा: Anjali Arora Trolled Again : अंजली पुन्हा ट्रोल; तिरंगा फडकवल्यानंतर युजर म्हणाले...

चित्रपटाच्या आतापर्यंतच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर लाल सिंह चड्ढाने (Laal Singh Chaddha) चार दिवसांत ३७ कोटींची कमाई केली आहे. चित्रपट हळूहळू वेग पकडत आहे. चार दिवसांत चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा ओलांडला नाही हे निराशाजनक आहे. या वेगाने चित्रपटाने कमाई केली तर दोन दिवसांत लाल लाल सिंग चड्ढा ५० कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो.

चित्रपटाने कोणत्या दिवशी किती कमाई केली?

  • लाल सिंग चड्ढाने पहिल्या दिवशी ११.५० कोटींचे कलेक्शन केले होते.

  • दुसऱ्या दिवशी चित्रपटाने केवळ ६.५० ते ७ कोटींची कमाई केली होती.

  • शनिवारी चित्रपटाने २० टक्क्यांच्या वाढीसह ८.५० कोटींचा कलेक्शन केले होते.

  • रविवारी चित्रपटाने १० कोटींची कमाई केली.

हेही वाचा: Raju Srivastav : राजूच्या भावाने सांगितले शुद्धीवर न येण्याचे कारण; म्हणाला...

लाल सिंग चड्ढा हा हॉलिवूडचा क्लासिक चित्रपट फॉरेस्ट गंपचा रिमेक आहे. हा चित्रपट आमिर खानचा (Aamir Khan) ड्रीम प्रोजेक्ट आहे. चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर मुख्य भूमिकेत आहे. मोना सिंग आमिर खानची आई झाली आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचे ​​खूप कौतुक होत आहे. आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाची अक्षय कुमारच्या रक्षाबंधनाशी टक्कर आहे. आता १५ ऑगस्टला चित्रपटाच्या बिझनेसला किती फायदा होतो ते बघूया. वीकेंडचा चित्रपटाला फायदा झाला.

टॅग्स :aamir khan