ऑगस्टमध्ये असणार 'काटेकी टक्कर', हे बिग बजेट सिनेमे होणार प्रदर्शित.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

laal singh chaddha de dhakka 2 rakshabandhan liger and this movie release in august 2022

ऑगस्टमध्ये असणार 'काटेकी टक्कर', हे बिग बजेट सिनेमे होणार प्रदर्शित..

movie relese in august 2022 : टाळेबंदी नंतर मनोरंजनाचे माध्यम खुले झाले प्रेक्षकांनी पुन्हा एका नाट्यगृह आणि चित्रपटगृहांची वाट धरली. प्रेक्षक येतील, गर्दी होईल का अशा अनेक शंका निर्मात्यांना होत्या. परंतु अशा परिस्थितीतही मराठीतील पहिला रिलीज झालेला 'झिम्मा' चित्रपट हीट ठरला. त्यांनंतर ही चित्रपटांची गाडी सुसाट वेगात धावत असलेली दिसत आहे. अगदी दाक्षिणात्य चित्रपटालाही भरभरून प्रेम मिळाले. आता ऑगस्ट महिन्यात तर अनेक बिग बजेट सिनेमे रिलीज होणार आहेत. प्रेक्षकांसाठी जरी ही आनंदाची बाब असली तरी निर्मात्यांना मात्र मोठ्या स्पर्धेला सामोरं जावं लागणार आहे. जाणून घेऊया कोणते आहेत हे सिनेमे..

(laal singh chaddha de dhakka 2 rakshabandhan liger and this movie release in august 2022)

1. आमिर खान, करीना कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाची प्रेक्षकांना चांगलीच उत्कंठा लागली आहे. 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंम'चा हिंदी रिमेक आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अद्वेत चंदनने सांभाळली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून आमिर गेल्या अनेक दिवसांनी सिनेसृष्टीत कमबॅक करत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.

2. अक्षय कुमारसध्या एका मागोमाग एक सिनेमे घेऊन येत आहे. 2022 मध्ये त्यांचे 'पृथ्वीराज' आणि 'बच्चन पांडे' असे दोन सिनेमे रिलीज झाले. आता त्याचा तिसरा सिनेमा रिलीज होत आहे. 'रक्षाबंधन' असे या सिनेमाचे नाव असून 11 ऑगस्ट रोजी तो प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल रायने केलं आहे.

3. महेश मांजरेकर यांचा 'दे धक्का 2' हा सिनेमा 5 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केलं आहे. या सिनेमात मकरंद अनासपूरे, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, संजय खापरे अशी तगडी कास्ट आहे.

4. दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाचा बहुचर्चित 'यशोदा' हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात समंथासोबत उन्नी मुकुंदन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा हरेश नारायणने सांभाळली आहे.

5. सुमीत राघवन अभिनीत 'एकदा काय झालं' हा सिनेमा 5 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुमीत सोबत उर्मिला कोठारे, बालकलाकार अर्जुन पुर्णपात्रे या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. या सिनेमात डॉ. सलील कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार अशी तिहेरी कामगिरी केलेली आहे.

6. 'कार्तिकेय 2' हा सिनेमा 12 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात निखिल सिद्धार्थ, अनुपमा परमेश्वरन, आदित्य मेनन, अनुपम खेर, हर्षा चेमुडू यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चंदु मोनदेतीने या सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि तामिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.

7. 'लायगर' सिनेमाच्या माध्यमातून विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा सिनेमा 25 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. करण जोहरने या सिनेमाची निर्मिती केली असून पुरी जगन्नाथने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात विजयसह अनन्या पांडे आणि राम्या कृष्णनदेखील दिसणार आहे.

8. आलिया भटची पहिलीच निर्मिती असलेला 'डार्लिंग्स' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. आलियसह या सिनेमात विजय वर्मा, शेफाली शाह, रोशन मैथ्यू, विक्रम, इयाना चौधरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

9. भारतीय महिला क्रिकेटर मिताली राजच्या आयुष्यावर आधारित 'शाबास मिथु' हा सिनेमा आहे. या सिनेमात तापसी पन्नू मिताली राजच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा 15 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Laal Singh Chaddha De Dhakka 2 Rakshabandhan Liger And This Movie Release In August 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..