esakal | ‘हात नका लावू माझ्या साडीला’,पाहा शितलीचा भन्नाट डान्स

बोलून बातमी शोधा

Lagir jhal ji fame shivani  bavkar dance video viral
‘हात नका लावू माझ्या साडीला’,पाहा शितलीचा भन्नाट डान्स
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या विविध फोटोशूटमधील फोटो तसेच तिच्या डान्सचे व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते. शिवानीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. याबद्दल तिने ट्विट करत चाहत्यांना माहिती दिली. शिवानीने ट्विट केले,’ नमस्कार मित्रांनो! सर्व काळजी घेऊनही, दुर्देवाने माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी घरातच आयसोलेशनमध्ये आहे. माझ्या डॉक्टरांनी दिलेले सर्व प्रोटोकॉल फॉलो करत, डॉक्टरांनी सांगितल्यानुसार औषधोपचार करीत आहे. मी सर्वांना विनंती करते की आवश्यक खबरदारी घ्या आणि आवश्यक असल्यासच घराच्या बाहेर पडा. सुरक्षित रहा आणि निरोगी रहा. भेटू लवकरचं’ शिवानी सध्या होम क्वारंटाइन आहे. सोशल मीडियावर ती सध्या काही पोस्ट करत नाहिये. पण तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मेक अप आर्टिस्ट विनोद सरोदेने सोशल मीडियावर शिवानीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवानीने चंदेरी काठ असलेली काळी साडी नेसली आहे. तसेच डोक्यात गुलाबाचे फुल, नाकात नथ असा श्रुंगार या व्हिडीओमध्ये शिवानीने केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवानी हात नका लावू माझ्या साडीला या गाण्यावर थिरकत आहे. शिवानीच्या हावभाव आणि हटके अंदाजामुळे नेटकऱ्यांनी या व्हिडीओला पसंती दिली आहे.

शिवानीने ‘लागिरं झालं जी’ मालिकेमधून अभिनयाला क्षेत्रात पदार्पण केले पसंती मिळा. या मालिकेतील तिच्या शितली या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर शिवानी अनेक जाहिराती आणि मालिकांमधून शिवानी प्रेक्षकांच्या भेटीस आली.