
Mahesh Jadhav Won Gold Medal: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'लागिरं झालं जी' या मालिकेत 'टॅलेंट' ही भुमिका साकारुन घराघरात लोकप्रिय झालेला महेश जाधव हा आज चर्चेत आला आहे. या मालिकेत तो भैय्यासाहेबांच्या असिस्टंटच्या भुमिकेत चमकला.
त्याची हाईट कमी असल्याने नकळतपणे सर्वाचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. महेशने नुकतीच त्याच्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेयर केली आहे. त्यामुळे चहूबाजूंनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महेशनं 'महाराष्ट्र राज्य पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2023-24 मध्ये पुरुषांच्या 49 किलो वजनी गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
त्याचा फोटो शेयर करत महेशनं लिहिलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
महेश या पोस्टमध्ये लिहितो की, "शाळेत प्रार्थनेच्या रांगेत नं. 1 ला उभा 'Height' मुळे
आज तुमच्यासमोर हे Gold घेऊन उभा 'Fight ' मुळे"
आज तुम्हाला सांगायला आनंद होताये की 2nd Maharashtra State Para Powerlifting Championship 2023- 24 काल कल्याण येथे झाली त्यामध्ये Men's 49Kg मध्ये मी Gold मेडल मिळवले
यामागे खुप मेहनत तर आहेच पण त्याचबरोबर खुप लोकांचा सल्ला, मार्गदर्शन पण आहे यात मला माझे Trainer @kalim.sayyed.18 कलीम सर ,माझा मित्र @_vinod_taware विनोद तावरे याचे खूप सहकार्य मिळाले.तसेच एखाद्या खेळाडूला Practice,Workout बरोबर Diet पण खुप important असतो तशी माझी हे खा हे खाऊ नको बघणारी Dr.@purniemaadey_official ,आणि मला कायम सपोर्ट करत आलेला खुप मोठ्ठंसा मित्रपरिवार ,या सगळ्यांचा मी आभारी आहे.
आणि तुम्ही प्रेक्षक कायम माझ्यावर प्रेम करत आला आहात तर ही दुसरी Innning तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा व्यक्त करतो."
सध्या महेशची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
'लागिरं झालं जी' मालिकेनंतर महेश 'कारभारी लय भारी' या मालिकेत दिसला होता. केवळ मालिकाच नव्हे तर चित्रपटातही तो झळकला आहे. त्याने 'फकाट', 'माऊली' या चित्रपटात अभिनय केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.