Har Ghar Tiranga: आमिर खाननेही आपल्या घरावर फडकवला तिरंगा

एकीकडे आमिरच्या 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटातून भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केला जातोय तर दुसरीकडे आमिरच्या घरावरील तिरंगा बघून त्याचं काैतुक केलं जातंय.
Aamir Khan with indian flag seen in his home
Aamir Khan with indian flag seen in his homeesakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आग्रहानंतर हर घर तिरंगा फडकवण्याचं अभियान भारतात राबवण्यात येतंय. अनेक सेलिब्रिटींनीदेखील या अभियानाचं समर्थन केलंय. बॉलीवुड अभिनेता आमिर खानने देखील या अभियानाचं समर्थन करत त्याच्या राहत्या घरावर झेंडा फडकवलाय. आमिरची मुलगी ईरा खान आणि आमिर यांचा त्यांच्या बालकनीतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये आमिरच्या बाजूला भारतीय ध्वजही दिसतोय. (Aamir Khan with indian flag seen in his home)

एकीकडे आमिरच्या लाल सिंग चढ्ढा या चित्रपटातून भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केला जातोय तर दुसरीकडे आमिरच्या घरावरील तिरंग्यातून त्याचं देशप्रेम दिसून येतंय. त्यामुळे त्याचा हा फोटो बघून त्याचं सोशल मीडियावरही कौतुक केलं जातंय. शीख धर्मीय लोकांचा तसेच भारतीय सैन्यांचा आमिरने त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटातून अपमान केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आलाय. दहा वर्षातील आमिरचा हा पहिलाच चित्रपट असा होता ज्याला प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळालाय.

Aamir Khan with indian flag seen in his home
Har Ghar Tiranga तिरंग्याच्या विद्युत रोषणाईने सजली ऐतिहासिक स्थळं

हर घर तिरंगा अभियानाला आजपासून सुरूवात

माहितीसाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरी तिरंगा फडकवण्याचा व सोशल मीडिया अकाउंटवर तिरंग्याची प्रोफाईल ठेवत भारताचा अमृत मोहोत्सव साजरा करण्याचा आग्रह केलाय. त्याअंतर्ग हर घर तिरंगा अभियान भारतात आजपासून सुरू झालंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com