
Sushmita lalit Affair: भारतात आयपीएलचा दबदबा तयार करणारे ललित मोदी तुफान चर्चेत आले आहे. आपण सुष्मिताला डेट करत आहोत आणि आता लवकरच गोड बातमी देणार असं त्यांनी ट्विट केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर (Lalit Modi Social Media Post) वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियांना उधाण आलं होतं. खुद्द अभिनेत्री सुष्मिता सेननं यासगळ्या अफवा असल्याचे सांगत आपण कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नसल्याचे स्पष्ट केले होते. गेल्या काही (Entertainment News) दिवसांपासून सुष्मिता आणि ललित मोदी हे नेटकऱ्यांच्या (Bollywood Actress Sushmit Sen) रडारवर आले आहेत. त्यांच्यावर प्रचंड टीका होत असताना या दोन्ही सेलिब्रेटींनी ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले आहे. आता पुन्हा ललित मोदींनी पोस्ट करत नेटकऱ्यांवरच आगपाखड केली आहे.
ललित मोदींनी तर सुरुवातीला सुष्मिता सेनसोबत लग्न केल्याचे व्टिट केले होते. त्यानंतर ती पोस्ट बदलून आपण एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले होते. (Sushmita Social Media Post News) त्यावर बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीननं सुष्मितावर निशाणा साधला होता. ती हे सगळं पैशांसाठी करत असल्याचे सांगितले होते. गोल्ड डिगर असं म्हणून सुष्मितावर टीका करण्यात येत होती. यासगळ्यात सुष्मिताचा भाऊ राजीव तिच्या पाठीशी उभा होता. त्यानं आपल्या बहिणीची बाजू घेत सोशल मीडियावर जे काही सुरु आहे त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. सुष्मितानं देखील यासगळ्या अफवा असल्याचे सांगून ललित मोदी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
आता मोदी यांची पुन्हा एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी आपल्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. अनेकांनी ललित मोदी आणि सुष्मिता यांच्या वयावरुन त्यांना ट्रोल केले आहे. तर कुणी मोदी यांचे भारतातून पळून जाणे, त्यांच्यावर झालेला भ्रष्टाचाराचा आरोप याचा संबंध सुष्मिता सेनशी जोडला गेला आहे. त्यावरुन मोदी यांनी ट्रोलर्सला फटकारले आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, मला एकच गोष्ट सांगा कोणत्या न्यायलयानं मला दोषी ठरवले आहे. माझ्यावर सतत भ्रष्टाचाराचे जे आरोप होत आहेत पण मला कुणीही दोषी म्हटलेलं नाही. सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की, भारतातील 15 पैकी 12 शहरांमध्ये बिझनेस करणं किती अवघड गोष्ट आहे.
लोकांनी मला पळपुटा म्हटलं आहे. मला आता तुम्हाला काहीही सांगायचं नाही. कारण कुणी मी काय बोलतोय हे ऐकून घ्यायला तयार नाही. माझं म्हणणं न ऐकताच मला ट्रोल केले जात आहे. लोकांनी आरोप थांबवावेत. आम्हाला शांतपणे जगु द्यावं. यापूर्वी देखील मोदी यांनी मोठी पोस्ट करुन आपली व्यथा नेटकऱ्यांसमोर मांडली होती. दुसरीकडे सुष्मितानं देखील आता आपल्याला नेटकऱ्यांच्या म्हणण्याचं काही वाटत नसल्याचे सांगितले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.