
रणवीर सिंग पाठोपाठ अभिनेता विष्णू विशालनेही केलं न्यूड फोटोशूट..
bollywood celebrities nude photoshoot : काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणवीर सिंग याने न्यूट फोटो शेअर केले होते, त्या फोटोंची बरीच चर्चा झाली. अनेकांनी त्याचं कौतुकही केलं. अशा पद्धतीने व्यक्त होणे हे देखील एक धाडस असल्याचे बोलले गेले. रणवीर(ranveer singh)च्या त्या फोटोंवर सुरु असलेली चर्चा अजून ताजी असतानाच दाक्षिणात्य अभिनेता विष्णू विशाल यानेही न्यूड फोटोशूट करत आपले फोटो शेअर केले आहेत. आता या फोटोंवर नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(After Ranveer Singh, Vishnu Vishal joins 'the trend' and poses nude as wife Jwala Gutta turns photographer)
रणवीर सिंहने एका मॅगझिनसाठी बोल्ड फोटोशूट केले होते. या फोटोंमध्ये अभिनेता पूर्णपणे कपड्यांशिवाय होता. त्याचे हे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला. काहींनी टीका केली तर काहींनी कौतुक. या काही दिवस झाले नाही तोवर आणखी एक न्यूड फोटोशूट समोर आलं आहे. अभिनेता विष्णू विशाल यानेआपले न्यूड फोटो शेअर केले आहेत. अभिनेता विष्णू विशाल हा बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हीचा पती असून तो साऊथ चित्रपटात त्याचे बरेच नाव आहे. विशालनेसुद्धा न्यूड फोटो शेअर करताच पुन्हा एकदा सर्वजण चकीत झाले आहेत.
यामध्ये विष्णू विशाल बेडवर वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. विष्णूने शेअर केलेल्या या फोटोला सेमी न्यूड फोटो म्हणतात. म्हणजे त्याने आपल्या अंगावर एक पांढऱ्या रंगाची चादर घेतली आहे. विष्णूने स्वतः हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्यानं दिलेले कॅप्शन लक्ष वेधून घेते. 'आपणही नव्या ट्रेंड मध्ये सामील झालो आहोत' असं तो म्हणतो. शिवाय हे फोटोशूट त्याची पत्नी ज्वाला गुट्टा हिनेच केले असल्याचेहि त्याने सांगितले आहे
विष्णू विशाल अभिनेता बनण्यापूर्वी एक प्रसिद्ध क्रिकेटर होता. त्याने तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून क्रिकेट खेळलं आहे. परंतु त्याच्या पायाला दुखापत झाल्यांनतर त्याने क्रिकेटला रामराम केलं होतं. तो काही दिवसांपूर्वी तामिळ चित्रपट 'एफआयआर रेडी' मध्ये दिसून आला होता. तो लवकरच 'मोहनदास' या चित्रपटात दिसणार आहे. (vishnu vishal nude photoshoot)
Web Title: After Ranveer Singh Vishnu Vishal Joins The Trend And Poses Nude As Wife Jwala Gutta Turns Photographer
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..