Lalit Modi नी मागितली Ranveer Singh ची माफी; जाणून घ्या काय आहे प्रकरण

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी आणि अभिनेत्री सुष्मिता सेन हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
Lalit Modi
Lalit ModiSakal

Lalit Modi Tweet : आयपीएलचे (IPL) माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) आणि अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. ललित मोदींनी सुष्मितासोबतचे काही रोमँटिक फोटो (Romantic Photo) शेअर करून त्यांच्यातील नात्याचा खूलासा केला होता. त्यानंतर अनेक स्तरावर हे जोडपे सध्या चर्चेचा विषय बनले आहे. मोदींच्या ट्वीटनंतर अभिनेता रणवीर सिंगनेही (Ranveer Singh) ललित मोदींच्या पोस्टवर दोघांचेही अभिनंदन केले होते. रणवीरच्या या ट्वीटला ललित मोदींनी उत्तर दिले असून, त्याची माफीही मागितली आहे. (Lalit Modi Latest News In Marathi)

रणवीरने ललित मोदींनी त्यांच्या आणि सुष्मिता सेनच्या रिलेशनशिप अनाउंसमेंट पोस्टवर कमेंट केली होती. यामध्ये रणवीरने रेड हार्ट आणि इविल आई इमोजी पोस्ट केले होते. यानंतर रणवीरची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यानंतर आता रणवीरच्या या शुभेच्छांचा ललित मोदींनी या शुभेच्छांचा वेगळ्या पद्धतीने आभार मानले आहेत.

Lalit Modi
उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जगदीप धनखडांशी सलमानचं खास नातं?

ललित मोदींच्या ट्विटमध्ये नेमकं काय?

ललित मोदींनी रणवीर सिंगने दिलेल्या शुभेच्छा दिल्याबद्दल ट्वीट (Tweet) करत आभार मानले आहेत. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'भावा तुझ्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. मला माफ कर असे म्हटले आहे. सध्या आयपीएल नाही. पण मी म्हटल्याप्रमाणे, वेळ काढून आणि तुला पाहिजे ते करण्याचा सल्ला दिला आहे. बाकी सगळ्या गोष्टी आपोआप होतील असे नमुद करण्यात आले आहे. पुढच्या वेळी युरोपमध्ये भेटू... तुम्हा दोघांना खूप खूप प्रेम. मोठ्या निर्मात्यांसाठी विनामूल्य मोमदला काही करू नका कारण लोक तुम्हाला पाहत असता, त्यांना नाही. असा मोलाचा सल्लादेखील ललित मोदींनी रणवीर सिंगला दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com