ललित प्रभाकरच्या वाढदिवशी हेमंत ढोमेची मोठी घोषणा, येतोय नवा चित्रपट.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lalit prabhakar birthday : director hemant dhome announce his new film prince of pargaon

ललित प्रभाकरच्या वाढदिवशी हेमंत ढोमेची मोठी घोषणा, येतोय नवा चित्रपट..

lalit prabhakar birthday: मालिका, चित्रपट, वेब सिरिज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ घालणारा अभिनेता ललित प्रभाकरचा आज वाढदिवस. ललित (Lalit Prabhakar Birthday) आज १२ सप्टेंबर रोजी आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर ललितवर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याने एक महत्वाची घोषणा करून ललितला चित्रपटाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. lalit prabhakar birthday : director hemant dhome announce his new film prince of pargaon

वाढदिवस ललितचा असला तरी विनोदी अभिनेता आणि उत्तम दिग्दर्शक हेमंत ढोमेने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने ललितच्या वाढदिवसांचे औचित्य साधून एक पोस्ट केली आहे. ही केवळ पोस्ट नसून त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा आहे. 'सनी' असे या चित्रपटाचे नाव असून ललित प्रभाकर प्रमुख भूमिकेत आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे आहे. या पोस्ट मध्ये ललितचा फोटो असून त्यावर 'हॅप्पी बर्थडे सनी भय्या' असे लिहिले आहे. शिवाय वर 'प्रिन्स ऑफ पारगाव' असा बोर्डही दिसतोय. याला हेमंतने भन्नाट कॅप्शन दिले आहे. तो म्हणतो, 'कुनी म्हनतं अग्गबाई, कुनी म्हनतं अय्या… बघुन ज्याला होते, मनाची ता थैय्या… ता थैय्या… ललित प्रभाकरचा वाढदिवस, म्हणजे मजा आ गय्या… मजा आ गय्या..!! आमचे लाडके ‘सनीभैय्या’ यांना त्या ठिकानी खूप खूप शुभेच्छा! भेटूया सनी भैय्याला १९ नोव्हेंबर पासुन तुमच्या जवळच्या थेटरात!' '

हेमंतच्या (Hemant dhome) झिम्मा (jhimma) चित्रपटाने करोनानंतर मराठी चित्रपट सृष्टीला चालना मिळाली. शिवाय बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने जोरदार कमाई केली होती. त्यामुळे हेमंत नवा चित्रपट कधी घेऊन येणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. अखेर आज त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. ललितने देखील हे चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

Web Title: Lalit Prabhakar Birthday Director Hemant Dhome Announce His New Film Prince Of Pargaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..