Lalit Prabhakar Tarri Trailer: त्याचं रक्त गरम.. ॲक्शन आणि रोमान्सची फोडणी म्हणजे ललितचा 'टर्री' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lalit prabhakar, tarri film

Lalit Prabhakar Tarri Trailer: त्याचं रक्त गरम.. ॲक्शन आणि रोमान्सची फोडणी म्हणजे ललितचा 'टर्री'

Tarri Trailer: ललित प्रभाकरच्या आगामी ‘टर्री’ सिनेमाचा ट्रेलर आज लाँच झाला. ललित प्रभाकरचा कधीही न पाहिलेला रॉकिंग अंदाज टर्री मध्ये पाहायला मिळतोय. ‘ऑन युव्हर स्पॉट’ आणि ‘फॅन्टासमागोरिया फिल्म्स’ यांच्या सहयोगाने 'टर्री' या डॅशिंग चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून प्रतीक चव्हाण, अक्षय आढळराव पाटील या चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते महेश सहानी आणि सुबूर खान आहेत. राष्ट्रीय पारितोषिक विजेते महेश रावसाहेब काळे यांनी चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे.

सध्या मराठीत मनोरंजन विश्वात चर्चा आहे ती 'टर्री' या चित्रपटाची. या चित्रपटाच्या ट्रेलरने तर धुरळा उडवलाच पण नुकतेच या चित्रपटाचे 'तुझ्या स्टेटसला लाव फोटो माझा' हे गाणे आले तरुणाईला वेड लागले. या लव्हस्टोरीत ललीतची हिरोईन कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष होते. टर्रीची प्रेयसी आपली लाडकी अभिनेत्री गौरी नलावडे असणार आहे.

गौरी या आधी 'गोदावरी' चित्रपटात दिसली होती. त्यावेळी तिच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले. या आधी तिने 'स्वप्नांच्या पलिकडले' ही मालिका देखील केली आता. पण आता मोठ्या पडद्यावर पुन्हा एका वेगळ्या भूमिकेत तिला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

मराठी सिनेमातील सध्याचा हॅन्डसम अभिनेता म्हटलं की ललित प्रभाकरचं नाव डोळ्यासमोर येतं. मराठी मालिका आणि सिनेमांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत ललितनं आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. ललितच्या आजपर्यंतच्या सिनेमांवर नजर फिरवली तर बहुतांशी सिनेमातून त्यानं रोमॅंटिक हिरोच साकारला आहे आणि त्यात त्याला यशही मिळालं आहे. त्यामुळे टर्री च्या माध्यमातून ललित पहिल्यांदा संपूर्ण ऍक्शन भूमिकेत दिसणार आहे.

झोंबिवली नंतर ललित या सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. ललित सोबत अभिनेत्री गौरी नलावडे या सिनेमात हिरोईन म्हणून झळकणार आहे. याशिवाय अभिनेते शशांक शेंडे या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. ललित प्रभाकरचा टर्री सिनेमा येत्या १७ फेब्रुवारीला सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे.