Gauri Nalawade Tarri Film: तो टर्री.. ती त्याची लव्हस्टोरी.. येतेय अँग्री ललितची प्रेमळ गौरी..

'गोदावरी' नंतर अभिनेत्री गौरी नलावडे ललित प्रभाकरच्या प्रेयसीच्या भूमिकेत..
actress Gauri Nalawade lead cast in Tarri Film with lalit prabhakar
actress Gauri Nalawade lead cast in Tarri Film with lalit prabhakar sakal

Gauri Nalawade in Tarri Film: सध्या मराठीत मनोरंजन विश्वात चर्चा आहे ती 'टर्री' या चित्रपटाची. या चित्रपटाच्या ट्रेलरने तर धुरळा उडवलाच पण नुकतेच या चित्रपटाचे 'तुझ्या स्टेटसला लाव फोटो माझा' हे गाणे आले तरुणाईला वेड लागले. आता या चित्रपटा बाबत एक मोठी घोषणा झाली आहे.

(actress Gauri Nalawade lead cast in Tarri Film with lalit prabhakar )

या चित्रपटात यंग, हँडसम अँड दबंग हीरो ललित प्रभाकर प्रमुख भूमिकेत असल्याने ही एक पर्वणी होतीच पण या चित्रपटात या अॅक्शन हिरोच्या जोडीला एक गोड आणि प्रेमळ अभिनेत्रीही असणार आहे, ती म्हणजे त्याची प्रेयसी..

या लव्हस्टोरीत ललीतची हिरोईन कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर तो चेहरा समोर आला असून या टर्रीची प्रेयसी आपली लाडकी अभिनेत्री गौरी नलावडे असणार आहे. गौरीने नुकतच एक पोस्टर शेअर करत याची घोषणा केली.

हेही वाचा- ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

actress Gauri Nalawade lead cast in Tarri Film with lalit prabhakar
Annu Kapoor admitted: अभिनेते अन्नू कपूर रूग्णालयात.. प्रकृती बाबत मोठी अपडेट..

ललित आणि गौरीचे एकत्र फोटो असलेला पोस्टर शेयर करत तिने एक भन्नाट कॅप्शन दिले आहे. 'तो अवली, ती त्याची सावली..! तो टर्री, ती त्याची लव्हस्टोरी..!'' असे ती म्हणाली आहे.

गौरी या आधी 'गोदावरी' चित्रपटात दिसली होती. त्यावेळी तिच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले. या आधी तिने 'स्वप्नांच्या पालिकडके' ही मालिका देखील केली आता. पण आता मोठ्या पडद्यावर पुन्हा एका वेगळ्या भूमिकेत तिला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

आता आपल्या मैत्रीसाठी ललित काय ‘टर्री’गिरी करणार हे येत्या १७ फेब्रुवारीला ‘टर्री’ चित्रपटातून आपल्याला समजणार आहे. ‘ऑन युव्हर स्पॉट’ आणि ‘फॅन्टासमागोरिया फिल्म्स’ यांच्या सहयोगाने 'टर्री' या डॅशिंग चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून प्रतीक चव्हाण, अक्षय आढळराव पाटील या चित्रपटाचे निर्माते आहेत.

तर सहनिर्माते महेश सहानी आणि सुबूर खान आहेत. राष्ट्रीय पारितोषिक विजेते महेश रावसाहेब काळे यांनी चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे.१७ फेब्रुवारीला 'टर्री' चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओ करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com