लाराची 'किसिंग सीन'वर प्रतिक्रिया; म्हणाली, यापूर्वी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lara dutta
लाराची 'किसिंग सीन'वर प्रतिक्रिया; म्हणाली, यापूर्वी...

लाराची 'किसिंग सीन'वर प्रतिक्रिया; म्हणाली, यापूर्वी...

बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता हिने नवदीचा काळ गाजवला आहे. त्याचप्रमाणे लारा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. गेल्या काही दिवसांपासून लारा ही तिच्या ‘Hickups & Hookups’ या सीरिजमुळे चर्चेत आहे. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऑनस्क्रिन किंसींग सीन द्यायला काही हरकत नसल्याचं लारा म्हणाली होती.

लाराने नुकतीच फिल्म कंपॅनियनला मुलाखत दिली आहे. त्यावेळी लारा ऑनस्क्रिन किसींग सीन देण्याबद्दल बोलताना दिसली. “एक कलाकार म्हणून मला सर्व पैलूंचा शोध घ्यायचा आहे. पण भारतात मी पण कोणाची तरी पत्नी आहे. मी एक आई, मुलगी आणि सून आहे. सुदैवाने किंवा दुर्दैवाने, काही विशिष्ट अटी असतात ज्या आपल्याला दिल्या जातात, त्या कुठेतरी आपल्या लक्षात असतात. त्यामुळे अर्थातच, जर मी असा शो करणार आहे, ज्यात असे काही सीन आहेत, तर त्यासाठी थोडा विचार करावा लागतोच. या गोष्टीवर महेशशी चर्चा करणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाच होतं. कारण यावरून कळणार होतं की मला यात अस्वस्थ तर वाटत नाहीये किंवा मी काय करु शकते. त्यावर लोकांची प्रतिक्रिया काय असू शकते अशा सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि माझ्या मर्यादा काय आहेत हे मला माहित आहे. म्हणूनच मी याबद्दल अगदी स्पष्ट आहे.” असं लारा म्हणाली.

हेही वाचा: मुंबईत कतरिना-विकीचं पुढच्या आठवड्यात लग्न?

त्यानंतर लाराने चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन करण्यावरचा तिचा दृष्टिकोन सांगितला. “मी यापूर्वीही हे केलं आहे आणि मला माहीत आहे की मला ऑनस्क्रीन किस करण्यात कोणतीही अडचण नाही. फक्त एक कलाकार म्हणून मला माहीत आहे,की ही दृश्ये शूट करणं किती तांत्रिक आहे. जेव्हा तुम्ही सेटवर जाता तेव्हा दोन कलाकारांना एकत्र पाठवून असं बोललं जात नाही की तुम्ही इंटिमेट सीन करा आणि आम्ही पाहतो तुमच्यात ती केमिस्ट्री आहे की नाही. हे सगळं जेव्हा स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं असतं तेव्हाच घडतं.”

लवकरच लाराची ‘Hickups & Hookups’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अनेक ओळखीचे चेहरे पाहायला मिळणार आहेत. ही सीरिज २६ नोव्हेंबर रोजी लायन्सगेट प्ले या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

loading image
go to top