
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांसह काही कलाकार मंडळी उपस्थित होती. वीस ते बावीस जणांच्या उपस्थितीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याला अखेरचा निरोप देण्यात आला. त्याचे वडील के. के. सिंह यांनी त्याच्या पार्थिवाला अग्नी दिला.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांसह काही कलाकार मंडळी उपस्थित होती. वीस ते बावीस जणांच्या उपस्थितीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याला अखेरचा निरोप देण्यात आला. त्याचे वडील के. के. सिंह यांनी त्याच्या पार्थिवाला अग्नी दिला.
सुशांत सिंह राजपूत याने काल आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येने सारा देश हळहळला. हिंदी चित्रपटसृष्टी निशब्द झाली. आज सकाळी त्याच्या पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आला.
हेही वाचा: पोलिसांच्या तपासात सुशांतसिंग राजपूतबद्दल समोर आली 'ही' महत्त्वाची माहिती...
आज दुपारी पटना येथून त्याचे वडील के. के. सिंह तसेच अन्य काही कुटुंबीय यांचे विमानाने येथे आगमन झाले. आज सकाळपासूनच कूपर रुग्णालयाबाहेर सुशांतच्या चाहत्यांची गर्दी जमली होती. पोलिसांनी या गर्दीला आटोक्यात आणले.
त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीने रुग्णालयात जाऊन त्याचे अंतिम दर्शन घेतले. सायंकाळी त्याचे पार्थिव रुग्णालयातून पवनहंस स्मशानभूमीत आणण्यात आले. तेथेही चाहत्यांनी गर्दी केली होती.
हेही वाचा: का..का..का..? सुशांत असं का केलंस?..अमिताभ बच्चन यांनी लिहिला ब्लाॅग...
स्मशानभूमीत त्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी श्रद्धा कपूर, विवेक ओबेराय, क्रिती सेनन, वरुण शर्मा, उदित नारायण, रणवीर शौरी, दिनेश वीजन, पूजा चोप्रा आणि संजय निरुपम या मंडळीबरोबर काही टीव्ही कलाकारदेखील उपस्थित होते. पाऊस असल्यामुळे आणि त्यातच चाहत्यांची गर्दी झाल्यामुळे तेथे वाहतूक कोंडी झाली होती.
last rights on sushant singh rajput did by his father