esakal | रानू मंडल यांना लतादिदींचा सल्ला; सोशल मीडियावरही दोघींची तुलना
sakal

बोलून बातमी शोधा

lata didi s reaction on ranu mandal

एका न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी रानू मंडल यांच्यावर लता मंगेशकर यांनी मत व्यक्त केलं आहे.

रानू मंडल यांना लतादिदींचा सल्ला; सोशल मीडियावरही दोघींची तुलना

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : रानू मंडल यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा हे' गाणं गायलं आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रानू मंडल यांची चर्चा आहे. त्यांच्या गाण्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गायक हिमेश रेशमियाने त्यांना ऑफर दिली आणि आता रानूसोबत त्याने तीन गाणी रेकॉर्ड केली आहेत. रानू यांचा आवाज लतादिंदिसारखा असल्याचं मत काहींनी व्यक्त केलं. तर दुसरीकडे लतादिदिंच्या आवाजाची कोणाशी तुलना होऊ शकत नाही असंही मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं.

 

आता मात्र स्वत: लतादिदींनी रानू मंडल यांच्या एकूण परिस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी रानू मंडल यांच्यावर मत व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या, "माझं नाव आणि गाणं याने जर कोणाचं भलं होत असेल तर मी स्वत: ला भाग्यवान समजते. पण, मला असंही वाटत की कोणाची नकल करण्याच्या जोरावर तुम्हाला फार काळ यश मिळू शकत नाही. किशोरदा, मोहम्मद रफी, आशा भोसले आणि मुकेश यांच्या गाण्यांनी काही काळ तुम्हाला प्रसिद्धी मिळते पण ती टिकून राहत नाही. अनेक रिअॅलिटी शोमध्ये मुलं माझी गाणी खूप छान गातात पण त्यातील काही मोजकीच गाणी लक्षात राहतात. मी फक्त सुनिधी चौहान आणि श्रेया घोशाल यांना ओळखते."

यापुढे रानू यांना सल्ला देताना लतादीदी म्हणाल्या की, "ऑरिजिनल रहा. सर्व गायकांची एव्हरग्रीन गाणी गा. पण काही काळानंतर स्वत:चं गाणं शोधल पाहिजे.

loading image
go to top