
लता मंगेशकर यांचा उपचारांना प्रतिसाद;कुटुंबाने मानले चाहत्यांचे आभार
गानसम्राज्ञी लता मंगेशकर(Lata Mangeshkar) यांच्या प्रकृती स्वास्थ्याबाबत माहिती देणारी एक पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून मंगेशकर कुटुंबियांतर्फे शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार लता मंगेशकर अद्याप आयसीयुत उपचारासाठी असल्या तरी त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असताना दिसत आहे. गुरुवारी सकळी त्यांना एक्स्टूबेशनची ट्रायल देण्यात आली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत. मुंबईतील ब्रीचकॅंडी इस्पितळातील डॉ. प्रतित समदानी आणि त्यांची टीम लता दिदींवर उपचार करीत आहेत.
लता मंगेशकर यांची प्रकृती सुधारावी म्हणून त्यांच्या चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनेसाठी मंगेशकर कुटुंबियांनी आभार व्यक्त केले आहेत. लता मंगशेकर या ९२ वर्षांच्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर त्यांना मुंबईतील ब्रीचकॅंडी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीविषयीच्या अपडेट्स त्यांच्या कुटुंबियांमार्फत देण्यात येते. आजच प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीविषयी अफवा पसरविण्यात आली होती. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी आवाहन केलं होतं की अफवा पसरवू नका,प्रार्थना करा. भारतरत्न लता मंगेशकर या केवळ भारताच्या नाहीत तर जगातील प्रत्येकाच्या आवडत्या गायिका आहेत. त्यांचे चाहते जगभरात आहेत. आजही त्यांनी गायलेली गाणी लोकांच्या मनावर राज्य करतात.
Web Title: Lata Mangeshkar Is Showing Signs Of Improvement Entertainment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..