esakal | अभिनेत्री सायरा बानू रुग्णालयात दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेत्री सायरा बानू रुग्णालयात दाखल

अभिनेत्री सायरा बानू रुग्णालयात दाखल

sakal_logo
By
स्वाती वेमूल

दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानू Saira Banu यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रक्तदाबाशी संबंधित समस्येमुळे त्यांना तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज (बुधवारी) त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे. सायरा यांच्या कुटुंबातील जवळचे सदस्य त्यांच्यासोबत रुग्णालयात आहेत.

दिलीप कुमार यांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या, त्यांच्या प्रत्येक सुखदु:खात सावलीप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी सायरा बानो यांच्यावर जुलै महिन्यात दु:खाचा डोंगरच कोसळला. ७ जुलै रोजी दिलीप कुमार यांचे निधन झाले. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची जोडी चाहत्यांसाठीही सर्वांत लोकप्रिय आहे. दिलीप कुमार यांच्या निधनाने सायरा बानो खूप खचल्या होत्या.

हेही वाचा: मुंबई दंगलीच्या वेळी दिलीप कुमार-शरद पवार भेटीचा फोटो, शबाना आझमींनी केला शेअर

सायरा बानू यांनी वयाच्या १७व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'जंगली' या चित्रपटातून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्यांनी शम्मी कपूरसोबत भूमिका साकारली होती. यामधील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होतं. १९६१ ते १९८८ या कालावधीत सायरा यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दिलीप कुमार आणि सायरा बानू यांचं प्रेम कोणत्याही परिकथेपेक्षा कमी नाही. वयाच्या १२व्या वर्षीच सायरा त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या. आयुष्यातील प्रत्येक प्रसंगामध्ये त्यांनी दिलीप कुमार यांची साथ दिली. उतार वयातही त्या दिलीपजींची काळजी घेत होत्या.

loading image
go to top