'मी पारशी ते मुस्लिम होते,धर्मांतराला माझा विरोध होता'

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 29 November 2020

वाजिद यांचं जाणं हे माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता असे त्यांची पत्नी कमलरुख खान यांनी म्हटले आहे. ते गेल्यानंतर देखील माझ्यावरील अन्याय काही थांबला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मुंबई - लव जिहादवरुन सध्या वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या मुद्दयाने सा-या देशाचे लक्ष वेधूव घेतले आहे. लव जिहाद यावर होणा-या कायद्यावर समाजातील अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सध्या दिवंगत संगीतकार वाजिद खान यांच्या पत्नीनं केलेला खुलासा ब-याच गोष्टींवर प्रश्न उपस्थित करणारा आहे. प्रेमविवाह असणा-या वाजीद यांच्या पत्नीला मात्र सासरच्या मंडळींकडून त्रास सहन करावा लागला आहे. त्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

वाजिद यांचं जाणं हे माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता असे त्यांची पत्नी कमलरुख खान यांनी म्हटले आहे. ते गेल्यानंतर देखील माझ्यावरील अन्याय काही थांबला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. वाजिदच्या कुटूंबियांकडून मला त्रास सहन करावा लागल्याचा आरोप कमलरुख यांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना म्हणाल्या,  माझा धर्म पारशी तर त्यांचा मुस्लीम होता. कॉलेजपासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. विशेष विवाह कायद्याअंतर्गत आमचं लग्नही झालं.  आता जी काही धर्म परिवर्तन विधेयकासंबंधी सुरु असलेली चर्चा माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. मला आंतरजातीय विवाहाबद्दलचा माझा अनुभव कथन करायचा आहे. आजच्या युगातही एखाद्या स्त्रीला धर्माच्या नावाखाली भेदभाव आणि दु:ख सहन करावं लागतं, ही लज्जास्पद आणि डोळ्यांत अंजन घालणारी गोष्ट आहे.

आमच्यातील काही  वैचारिक मतभेदाचा फटका हा काही अंशी दोघांनाही सहन करावा लागला. मात्र वाजीदच्या घरच्यांचा माझ्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन बदलत चालला होता. वाजिद खान यांच्या कुटुंबातून त्यांना बाहेर काढलं गेलं होतं. धर्मांतर नाही केला तर घटस्फोटाचीही भीती दाखवली गेली, असं त्यांनी लिहिलं. ‘मी उद्ध्वस्त झाले होते, माझा विश्वासघात झाला होता, पण माझ्या मुलांनी माझी साथ दिली’, अशा शब्दांत त्यांनी कमलरुख यांनी आपले अनुभव यांनी सोशल मीडियावर आंतरजातीय विवाहासंबंधी लिहिलेल्या मोठ्या पोस्टमध्ये व्यक्त केले आहे.

व्हिडिओ: कपिल शर्माने आईसोबत केलं वर्कआऊट, एकमेकांना देत होते टक्कर  

लग्न होण्या अगोदर दहा  वर्षांपासून वाजिद व कमलरुख रिलेशनशिपमध्ये होते.लग्नानंतर स्वातंत्र्य, शिक्षण आणि लोकशाही मूल्यव्यवस्था ही माझ्या पतीच्या कुटुंबासाठी सर्वांत मोठी समस्या होती. त्यांना एक सुशिक्षित, स्वत:ची वेगळी विचारसरणी असलेली, स्वतंत्र स्त्री नको होती. धर्मांतर करण्याला माझा विरोध होता आणि त्यामुळे पती-पत्नी म्हणून आमचं नातं संपुष्टात आलं. धर्मांतर करून त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी झुकण्यास माझा स्वाभिमान नकार देत असल्याची खंतही कमलरुख यांनी व्यक्त केली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: late music director wajid khan wife kamlarukh khan reveled reality behind her relationship